उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ. आज 3 व्यक्तींनी केले नामनिर्देशनपत्र दाखल,8 व्यक्तींनी घेतले 23 अर्ज, तीन दिवसात 49 व्यक्तींनी खरेदी केले 118 अर्ज.

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ.

आज 3 व्यक्तींनी केले नामनिर्देशनपत्र दाखल.

8 व्यक्तींनी घेतले 23 अर्ज,

 तीन दिवसात 49 व्यक्तींनी  खरेदी केले 118 अर्ज.





प्रतिनिधी :- रुपेश डोलारे धाराशिव

धाराशिव दि 16 -   40 - उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी आज 16 एप्रिल 2024 रोजी तीन व्यक्तींनी नामनिर्देशनपत्र दाखल केले.यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मित्रपक्ष महायुतीच्या उमेदवार म्हणून सौ अर्चना राणाजगजितसिंह पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्ष महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि मनोहर आनंद पाटील यांनी अपक्ष म्हणून नामनिर्देशितपत्र दाखल केले. 


       आज 8 व्यक्तींनी 23 अर्ज खरेदी केली.तीन दिवसात 49  व्यक्तींनी 118 अर्जाची खरेदी केली.