तीन मोटरसायकलसह एक आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.”
प्रतिनिधी :- रुपेश डोलारे धाराशिव
धाराशिव जिल्ह्यातील मालाविषयक गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेवून चोरीचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन. यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, यांचे आदेशावरुन सपोनि श्री. अमोल मोरे, सपोनि श्री. सचिन खटके, पोहेकॉ/327 विनोद जानरव, पोहेकॉ/1166 सय्यद, पोना/ 1611 जाधवर, पोना/1479 जाधवर, पोकॉ/1819 अरसेवाड, चालक पोह/1248 अरब, चालक पोकॉ/564 किंवडे यांचे पथक मालाविषयक गुन्ह्यातील आरोपीची माहिती काढात पेट्रोलिंग असताना पथकास गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, लक्ष्मी नगर ता. भुम येथील युवराज सुखदेव ओव्हळ यांच्या कडे एक चोरीची हिरो होंन्डा मोटरसायकल असुन तो सध्या आठवडी बाजार भुम येथे आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरुन पथकाने लागलीच आठवडी बाजार येथे जावून आरोपीचा शोध घेत असताना एका इसम पथकास पाहून पळून जत असताना पथकाने त्यास शिताफिने ताब्यात घेवून त्याचे नाव गाव विचारले असता त्यांने त्याचे नाव- युवराज सुखदेव ओव्हाळ, वय 35 वर्षे, रा.लक्ष्मी नगर भुम ता. भुम जि. धाराशिव असे सागिंतले व त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपुस केली असता त्यांनी प्रथमत: पोलीसंना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास अधिक विश्वासात घेउन विचारपुस केली असता त्यांनी सांगीतले की, मी गेल्या काही दिवसात भुम, वाशी येथुन मोटरसायकल चोरी केल्या आहे. अशी कबुली दिल्यावरुन नमुद आरोपीस ताब्यात घेवून त्यांचे कडून गुन्ह्यात चोरीस गेलेल्या 3 ,मोटरसायकल एकुण 01,05,000₹ किंमतीच्या जप्त करुन त्याची खात्री करता त्या मोटरसायकल पोलीस ठाणे भुम गुरंन 228/2018, कलम 379, वाशी पोलीस ठाणे गुरनं 114/2024 कलम 379, गुरनं115/2024 कलम 379 भा.दं.वि.सं. या गुन्ह्यातील असल्याची खात्री झाली. तसेच पोलीसांनी त्याच्या ताब्यातून माल हस्तगत करुन नमुद आरोपीस चोरीच्या 3 मोटरसायकलसह भुम पोलीसांच्या ताब्यात दिले.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी व मा. श्री. गौहर हसन. यांचे मार्गदर्शनाखाली सथानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. वासुदेव मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. अमोल मोरे, श्री सचिन खटके, पोहेकॉ- विनोद जानराव, हुसेन सय्यद, पोलीस नाईक नितीन जाधवर, बबन जाधवर, पोलीस अमंलदार रविद्रं आरसेवाड, चालक/ पोहेकॉ/ अरब, चालक पोकॉ/किंवडे यांच्या पथकाने केली आहे.
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.