आंदोरा,येरमाळा,येथे मल्हार दादा पाटील यांच्या, विजय संकल्प संवाद सभेस उदंड प्रतिसाद.

 आंदोरा,येरमाळा,येथे मल्हार दादा पाटील यांच्या, विजय संकल्प संवाद सभेस उदंड प्रतिसाद.


प्रतिनिधी :- रुपेश डोलारे धाराशिव

आंदोरा,येरमाळा,येथे श्री रामनवमीच्या पूर्वसंध्येला,मल्हार दादा पाटील यांच्या,विजय संकल्प संवाद सभेस उदंड प्रतिसाद लाभला. 


ज्यांच्या कामात राम आहे असा महायुतीचा लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी सर्वजण कार्य करत आहेत. 


महायुतीतर्फे अर्चनाताईंना उमेदवारी म्हणजे एका अर्थाने नारी शक्तीचा सन्मान आहे. आपल्या लोकसभा क्षेत्रातून काम करणारा आणि केंद्रातील विकासकामांना लोकसभा क्षेत्रात कार्यान्वित करणारा सक्षम उमेदवार निवडून द्यायचा आहे. 



आज विरोधकांना विकासाच्या मुद्द्यावर बोलणे शक्य नाही किंवा त्यांनी तसे काम सुद्धा केले नाही त्यामुळे निवडणूक इतर मुद्द्यावर वळविण्याचा केविलवाणा प्रयत्न ते करत आहेत. 


मोदीजींचं सरकार पुन्हा येणार हे काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. त्यांच्या विचारांच्या अनुकूल प्रतिनिधी निवडून आला तर घडणाऱ्या वेगवान विकासाचा लाभ आपल्या लोकसभा क्षेत्राला होणार आहे.


येणाऱ्या ७ मे रोजी आपल्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ.अर्चनाताई पाटील यांना घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.