अवकाळी पाऊस पुन्हा परतला, ‘यात’ तहसिल कार्यालय समोर वहाणाचे नुकसान… झाडे साईला काढण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते व युवा उद्योजक राहुल दादा भोसले यांचे विनामूल्य सहकार्य.

 अवकाळी पाऊस पुन्हा परतला, यात तहसिल कार्यालय समोर वहाणाचे नुकसान…

झाडे साईडला काढण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते व युवा उद्योजक राहुल (दादा) भोसले यांचे विनामूल्य सहकार्य.







प्रतिनिधी :- रुपेश डोलारे धाराशिव


तुळजापूर शहरात दि.२० एप्रिल रोजी दुपार नंतर अचानक वातावरण बदलून शहरात पावसाने हजेरी लावली.जवळपास तीन तास मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे.



तुळजापूर तहसील कार्यालय समोर अवकाळी पाऊस वाऱ्यामुळे विद्युत तारा तुटून पडले आहेत तसेच एक झाड थांबलेल्या टमटमवर कोसळले आहे यामुळे दुपारपासून लाईट विस्कळीत झाले आहे



तालुक्यांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी गारांनी झोडपून काढले. जोराचे वारे वाहू लागले. ढगांचा गडगडाट व विजांचा लखलखाट सुरू झाला. या पावसाने शासकीय विश्रामगृह परिसरात मोठे झाड कोसळले आहे तसेचशिंदे हायस्कूल प्रशालेचा परिसरात मोठे झाड भर रस्त्यावर कोसळल्याने रस्ता जाम झाला आहे हे झाडे रोडच्या साईडला काढण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते युवा उद्योजक राहुल भोसले हे विनामूल्य सहकार्य करीत आहेत यात काही ठिकाणी नुकसान झाले आहे. ग्रामीण भागात काही ठिकाणी आंब्याच्या बागांचेही नुकसान झाले आहे.