तुळजापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने,महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचाराचा, नारळ वाढवून शुभारंभ.

तुळजापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने,महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचाराचा, नारळ वाढवून शुभारंभ.



प्रतिनिधी :- रुपेश डोलारे धाराशिव

दिनाक,२७ एप्रिल २०२४ रोजी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुळजापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने इच्छापूर्ती गणेश मंदिरात तुळजापूरच्या जेष्ठ नागरिक यांच्या हस्ते,गणपतीची पुजा करून प्रचाराचा नारळ फोडण्यात आला, यावेळी जिल्हा दूध संघाचे चेअरमन बाळासाहेब शिंदे,शहराध्यक्ष महेश चोपदार, कार्याध्यक्ष दिनेश क्षिरसागर, भाजप शहराध्यक्ष शांताराम पेंदे,मा नगरसेवक सुभाष तात्या कदम, दत्ता भाऊ हुंडेकरी, आशुतोष कदम, गणेश गिरी महाराज,सचिव अभय माने,यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित यावेळी शहरातील शुक्रवार पेठ भागात घरोघरी जाऊन प्रचार करण्यात आला, व महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या अशी विनंती करण्यात आली.