खोगरे परिवाराचे सामाजिक कार्य कौतुकास्पद - श्री.उमाकांत मिटकर.
प्रतिनिधी :- रुपेश डोलारे धाराशिव
श्री.शाहूराज घोगरे व त्यांच्या परिवाराने आजच्या दुष्काळाच्या दाहकतेत धाराशिव शहरातील गरजू भागात पावसाळा सुरू होईपर्यंत टँकरने मोफत पाणीपुरवठा करण्याचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे असे मत राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचे न्यायिक सदस्य श्री उमाकांत मिटकर यांनी मांडले.
श्री.शाहूराज खोगरे हे भोसले हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक आहेत. त्यांचा मुलगा डॉ.रविराज खोगरे हे मुंबई येथे इन्कम टॅक्स कमिशनर तर सुनबाई डॉ.चेतना खोगरे या सामाजिक क्षेत्रात कार्यरत असतात.
घार फिरे आकाशी, तिचे लक्ष पिलापाशी याप्रमाणे डॅा.रविराज खोगरे यांचे मुंबई येथे काम असले तरी सातत्याने जिल्ह्यातील वृक्ष लागवड व संगोपण,गरजू मुलांना शैक्षणिक साहित्याची मदत,आरोग्य इत्यादि अनेक सामाजिक कामात सहभागी होतात.
यावेळी डॅा.चेतना खोगरे म्हणाल्या की,आपण भरपूर वृक्ष लावू त्याचे संगोपण करू,पाण्याची बचत करू,टॅंकरचा प्रश्न येणार नाही याची काळजी घेऊ.
संत गोरोबाकाका नगर, सांजा येथे झालेल्या कार्यक्रमात विशेष अतिथी राष्ट्रीय कर्तव्य अभियानाचे श्री.विजय वरूडकर,सामाजिक कार्यकर्ते श्री.सुधिर बिक्कड,विस्तार अधिकारी श्री.संजय ढाकने,ग्रामसेवक श्री.एकनाथ माने, श्री.अशोक बांगर,श्री.संतोष लाटे,ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.सदरील कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन सामाजिक कार्यकर्ते श्री.सुजित साळुंके यांनी केले.
खोगरे कुटूंबाच्या सौजन्याने सुरू केलेल्या मोफत पाणी पुरवठ्यामुळे नागरिकात आनंदाचे वातावरण आहे.
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.