खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची तुळजापुर येथे सभा.

 खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची तुळजापुर येथे सभा.



प्रतिनिधी :- रुपेश डोलारे धाराशिव

40- उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 करीता महाविकास आघाडीचे व शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आधिकृत उमेदवार खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या निवडणुक प्रचारार्थ माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार साहेब अध्यक्ष राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष यांच्या सभेचे आयोजन उद्या दि. 24/04/2024 रोजी आंबेडकर चौक, जुना बसस्टॅन्ड, तुळजापुर येथे सायंकाळी 6.00 वा. आयोजन करण्यात आले आहे. या सभेकरीता कॉग्रेस पक्षाचे माजी मंत्री अमितभैय्या देशमुख तसेच कॉग्रेस पक्षाचे विधानसभेचे माजी उपसभापती मधुकररावजी चव्हाण साहेब आदी प्रमुख नेते उपस्थीत राहणार असून या सभेकरीता नागरीकांनी मोठया प्रमाणात उपस्थीत रहावे असे अव्हान केले आहे.