“पीकअप व मोटरसायकलसह 2 आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक.

 “पीकअप व मोटरसायकलसह 2 आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक.”




प्रतिनिधी:- रुपेश डोलारे धाराशिव

धाराशिव जिल्ह्यातील मालाविषयक गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेवून चोरीचे गुन्हे उघडकीस आणणे कामी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन. यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, यांचे आदेशावरुन सपोनि श्री. सुदर्शन कासार, पोहेकॉ/576 शौकत पठाण पोहेकॉ/289 जावेद काझी, पोहकॉ/929 प्रकाश औताडे, पोहेकॉ/1275 फरहान पठाण, चालक पोकॉ/539 रत्नदिप डोंगरे यांचे पथक मालाविषयक गुन्ह्यातील आरोपीची माहिती काढात पेट्रोलिंग असताना पथकास गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, केज जि. बीड येथील पोलीस ठाणे बेंबळी व तुळजापूर येथील चोरीस गेलेले वाहन अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरुन पथकाने लागलीच केज जि. बीड येथे जावून आरोपीचा शोध घेत असताना दोन इसम पथकास पाहून पळून जत असताना पथकाने त्यास शिताफिने ताब्यात घेवून त्यांना त्याचे नाव गाव विचारले असता त्यांने त्याचे नाव- 1)नय्युम शब्बीर शेख, वय 45 वर्षे रा. केज जि. बीड, 2) प्रितम मोहनराव चव्हाण, वय 27 वर्षे, रा. केज जि. बीड असे सागिंतले व त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपुस केली असता त्यांनी प्रथमत: पोलीसंना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास अधिक विश्वासात घेउन विचारपुस केली असता त्यांनी सांगीतले की, आम्ही व आमचे इतर दोन मित्र यांनी गेल्या काही दिवसात तुळजापूर येथुन एक अशोक लेलॅड दोस्त कंपनीचा पिकअप अंदाजे 3,10,000₹ किंमतीचा व बेंबळी येथुन एक काळ्या रंगाची होंडा शाईन मोटरसायकल अंदाजे 30,000₹ किंमतीची चोरी केली आहे. अशी कबुली दिल्यावरुन नमुद आरोपीस ताब्यात घेवून त्यांचे कडून गुन्ह्यात चोरीस गेलेले एक पिकअप 1 ,मोटरसायकल असा एकुण 3,40,000 ₹ किंमतीचा माल जप्त करुन त्याची खात्री करता ते पिकअप व मोटरसायकल पोलीस ठाणे तुळजापूर गुरंन 176/2023, कलम 379, बेंबळी पोलीस ठाणे गुरनं 335/2023 कलम 379 भा.दं.वि.सं. या गुन्ह्यातील असल्याची खात्री झाली. तसेच पोलीसांनी त्यांच्या ताब्यातून माल हस्तगत करुन नमुद आरोपीस चोरीच्या पिकअप व मोटरसायकलसह तुळजापूर व बेंबळी पोलीसांच्या ताब्यात दिले.


            सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी व मा. श्री. गौहर हसन. यांचे मार्गदर्शनाखाली सथानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. वासुदेव मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सुदर्शन कासार, पोहेकॉ/ शौकत पठाण पोहेकॉ/ जावेद काझी, पोहकॉ/ प्रकाश औताडे, पोहेकॉ/ फरहान पठाण, चालक पोकॉ/ रत्नदिप डोंगरे यांच्या पथकाने केली आहे