“ गुंगीकारक औषध परवानगीशिवाय प्राशन करण्यास देणाऱ्यावर गुन्हा दाखल.

  “ गुंगीकारक औषध परवानगीशिवाय प्राशन करण्यास देणाऱ्यावर गुन्हा दाखल.”


प्रतिनिधी :- रुपेश डोलारे धाराशिव

नळदुर्ग पोलीस ठाणे : आरोपी नामे-भाग्यवती महेशमुमार चिनगुंडे, रा. नंदगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 24.05.2024 रोजी 17.00 ते 20.00 वा. सु. नंदगाव येथे फिर्यादी नामे- महेशकुमार जवाहरलाल चिनगुंडे, वय 48 वर्षे, रा. नंदगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना व त्यांचे घरातील इतर लोकांना अज्ञात कारणासाठी आंब्याच्या रसामध्ये झोपीच्या गुंगीकारक गोळ्या ज्यांचे जानकार वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्याशिवाय अयोग्य मात्रेचे सेवन केल्यास जिवीतास हाणी होवू शकते हे माहित असताना अशा गोळ्या आंब्याच्या रसात टाकल्याने फिर्यादी व त्यांचे घरातील लोकांनी सेवन केल्याने त्यांना गुंगी सेवून झोप लागून जाग आल्यास शारिरीक पिढा झाली आहे. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- महेशकुमार चिनगुंडे यांनी दि.28.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 328 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.