श्री. तुळजाभवानी मंदीर तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवीजींच्या सकाळच्या सिंहासन अभिषेक वेळी ६ जून २०२४ रोजी छत्रपती शिवरायांची मूर्ती ठेवून शिवराज्याभिषेक करण्यात येणे बाबत. राज्य समन्वयक सुनील नागणे यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन.

प्रतिनिधी :- रुपेश डोलारे धाराशिव

छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामीनी व महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारी श्री तुळजाभवानी मातेने छत्रपती शिवरायांना भवानी तलवार देऊन हिंदवी स्वराज निर्माण करण्यासाठी व शुभआशिर्वाद दिला. श्री तुळजा भवानी मंदीरात वर्षभरात अनेक सन, वार, उत्सव साजरे केले जातात. त्याच धरतीवर प्रती वर्षी ६ जून रोजी शिवराज्यभिषेक दिनांचे औचित्य साधून छत्रपती शिवरायांना देवींच्या सिंहासनवरती छत्रपती शिवारायांची मूर्तीला अभिषेक घालून भवानी तलवारीची विशेष अलंकार पुजा मांडली जावी.

श्री. आई तुळजाभवानी देवींच्या नवरात्रोत्सव काळात ज्या पध्दतीने भवानी तलवार अलंकार पुजा बांधली जाते त्याच पध्दतीने येणाऱ्या ६ जून २०२४ रोजी पासून शिवराज्याभिषेक दिन सोहळा आई तुळजा भवानीच्या मुख्य सिंहासन अभिषेकावेळी साजरा करण्यासाठी संबंधीतांना आदेश व्हावेत अशी विनंती करण्यात आली आहे,या निवेदनावर राज्य समन्वयक सुनील नागणे यांची स्वाक्षरी आहे.