पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं पुरातन रुप समोर, ७०० वर्षापूर्वीचा गाभारा.

पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं पुरातन रुप समोर, ७०० वर्षापूर्वीचा गाभारा.


मुख्य संपादक रुपेश डोलारे.

मंदिराच्या संवर्धनाच्या कामा दरम्यान मंदिराच्या अंतर्भागात नव्याने करण्यात आलेल बांधकाम हटवण्यात आल्याने मंदिराचं जुनं सुंदर स्वरुप समोर आलं आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये सध्या संवर्धनाचं काम सुरु आहे. सुमारे ७०० वर्षापूर्वीचे मंदिराचं दगडी बांधकाम त्यावरील आखीवरेखीव कलाकुसर पाहुन भक्तांचे मन तृप्त होत आहे. दरम्यान, मंदिराच्या संवर्धनाच्या कामामुळे १५ मार्चपासुन विठूमाऊलींचं चरण स्पर्श दर्शन बंद होत. या काळात मर्यादित कालावधीसाठी माऊलींचं मुखदर्शन सुरु होतं. संवर्धनाच्या कामानंतर आता विठू माऊलींसोबतच मंदिरातील गाभारा आणि मुख्य गाभारा यांचं दर्शनही भाविकांना होणार आहे. आता २ जूनपासून भाविकांना विठूमाऊलींचं चरणपददर्शन घेता येणार आहे. मात्र मंदिराच्या सुशोभिकरणाचं काम पूर्ण होण्यास अजून काही कालावधी लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे.