तुळजाभवानी कामगार संघटनेच्या मागणीला मोठे यश, संस्थापक अध्यक्ष सुरेश पवार यांची माहिती.

 तुळजाभवानी कामगार संघटनेच्या मागणीला मोठे यश, संस्थापक अध्यक्ष सुरेश पवार यांची माहिती.


प्रतिनिधी :- रुपेश डोलारे धाराशिव

   महाराष्ट्रातील जी एन एम, ए एन एम नर्सिंग कोर्सेस ला शिक्षण घेणाऱ्या विमुक्त जाती, विमुक्त जमाती, इतर मागास व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना इतर पाठ्यक्रमातील विद्यार्थ्याना देण्यात येणाऱ्या लाभाप्रमाणे सन 2023 24 पासून शिक्षण शुल्क,परीक्षा शुल्क,निर्वाह भत्ता मिळण्याचे शासन निर्णय पारित झाला.







     महाराष्ट्र राज्यामध्ये स्टेट बोर्ड पॅरामेडिकल अँड नर्सिंग टेक्निकल एज्युकेशन (MSBNTE ) अंतर्गत विनाअनुदानित जी.एन.एम आणि ए. एन.एम हे नर्सिंग कॉलेज कोर्सेस चालविले जातात.या कोर्सेसमुळे ग्रामीण स्तरावर शासकीय,निमशासकीय, खाजगी विभागात मोठ्या प्रमाणामध्ये रोजगारांची संधी उपलब्ध असल्यामुळे बहुतांश प्रमाणात या कोर्सेसला प्रवेश घेणाऱ्यामध्ये मुलींची संख्या नगण्य असते.


   सदरच्या कोर्सेसला सन 2012 पर्यंत प्रवेश घेणाऱ्या सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाच्या वतीने शिष्यवृत्तीच्या स्वरूपात शैक्षणिक सवलत मिळत होती. परंतु शैक्षणिक वर्ष 2012 च्या नंतर अनुसूचित जाती आणि जमाती हे प्रवर्ग वगळता विमुक्त जाती, जमाती इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळावयाची शैक्षणिक फि सवलत बंद झाल्यामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब मुले -मुली तसेच ऊसतोड कामगारांची मुले यांना नर्सिंग कोर्सेस शिकण्याची इच्छा असतानाही त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे या नर्सिंग कोर्सेसच्या कॉलेजची मोठया रकमेची फिस भरण्याची ऐपत नसल्यामुळे ते या कोर्सेसकडे पाठ फिरवल्यांचे दिसून येत होते.सन 2012 ते 2024 पर्यंत कालावधीत या प्रवर्गातील विद्यार्थ्यांमध्ये या कोर्सेसकडे शिक्षण घेणाऱ्यात फार मोठी शैक्षणिक दरी निर्माण झालेली होती.



       विमुक्त जाती जमाती,इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून देण्यासंदर्भात के.टी पाटील नर्सिंग कॉलेज धाराशिव चे प्राचार्य श्री.वाले सर आणि लातूर येथील नर्सिंग कॉलेजचे अध्यक्ष मा. कदम मॅडम यांनी संघटनेकडे शिष्यवृत्ती मिळवून देण्यासंदर्भात शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात यावे या बाबत सतत विनंती केल्यामुळे तुळजाभवानी कामगार संघटनेच्या वतीने शासन स्तरावर महाराष्ट्र राज्यांचे मुख्यमंत्री मा.श्री एकनाथजी शिंदे, मा.उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुलजी सावे, इतर बहुजन कल्याण विभागाचे उपसचिव सिद्धार्थ झाल्टे यांच्याकडे सतत केलेल्या पाठपुराव्याला गांभीर्याने घेऊन शैक्षणिक फिसची सवलत मंजूर करून दिनांक 14/06/2024 रोजी शासन पारित करण्यात आल्याने इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे आभार मनन्यात आले.

       पुढील काळात या नर्सिंग कोर्सेस ला प्रवेश घेणाऱ्यामध्ये ग्रामीण भागातील मुला मुलींची संख्या नक्कीच वाढणार आहे.

      तुळजाभवानी कामगार संघटनेच्या वतीने सामाजिक न्याय विभागाकडे ऊसतोड कामगारांना केलेल्या प्रयत्नात मोठे यश प्राप्त झालेले आहे. त्याप्रमाणे इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडे केलेल्या प्रयत्नालाही मोठे यश आल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झालेली आहे.