भिम - अण्णा सामाजिक संघटनेचे तुळजापुरात मंगळवारी रस्ता रोको आंदोलन, समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, अध्यक्ष सुरेश (आप्पा) भिसे यांचे आवाहन.
भिम - अण्णा सामाजिक संघटनेचे तुळजापुरात मंगळवारी रस्ता रोको आंदोलन, समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, अध्यक्ष सुरेश (आप्पा) भिसे यांचे आवाहन.
प्रतिनिधी :- रुपेश डोलारे धाराशिव
मातंग समाजावर होत असलेला अन्याय अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. जीवे मारण्याची धमकी, हल्ला, लाठीमार, डोके फोडणे, स्त्री ,मुले, वृद्ध यांना त्रास देणे. नको ते प्रकार घडताना पाहायला मिळतात.
मौजे. वडगाव (लाख) ता. तुळजापूर जि. धाराशिव येथील मयुर मोहन साळुंखे व त्यांच्या कुटुंबीयावर जातीवाचक शिवीगाळ करून प्राणघात हल्ला करणाऱ्या गावगुंडाना/ मारेकरांना तात्काळ अटक करण्यात यावी.
मौजे. दहिवडी ता. तुळजापुर जि. धाराशिव येथील मनिषा संतोष भालशंकर यांच्या मालकीच्या जमिनीवर इनरिच सौर ऊर्जा प्रा. लि. कंपनी चे अधिकारी व कर्मचारी बेकायदेशीर प्रवेश व अतिक्रमण करून बांधकाम केले.तसेच मनिषा भालशंकर आणि त्यांच्या मुलाला शिवीगाळ करत धक्काबुक्की करून जिवेमारण्याची धमकी दिली. इनरिच सौर ऊर्जा प्रा.ली. कंपनीचे अधिकारी तसेच कर्मचारी यांच्या विरोधात योग्यती कार्यवाही करण्यात यावी. यांना योग्य तो न्याय देण्यात यावा.
असे वारंवार मातंग समाजावर होत असलेला अन्याय अत्याचार थांबत नाही.बाबासाहेबांची शिकवण, दिलेला मूलमंत्र ध्यानी ठेवा, अंगीकार करा.. शिका ,संघटित व्हा आणि संघर्ष करा.
भिम - अण्णा सामाजिक संघटनेची ताकद सर्वांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. समाजाला न्याय मिळवून दिला पाहिजे. समाजाचे जे कोणी अधिकारी, पदाधिकारी, राजकारणी असतील ते समाजाकडे अजिबात लक्ष देत नाहीत.. समाजाबद्दल मुळीच अस्मिता नाही म्हणून हे सार घडताना दिसत आहे. भावांनो भेऊन चालत नाही संघर्ष करावाच लागेल त्यामुळे येणाऱ्या तारखेला 25/06/ 2024 रोजी वार: मंगळवार विश्वनाथ कॉर्नर चौक, तुळजापूर येथे भिम - अण्णा सामाजिक संघटना (महाराष्ट्र राज्य) रस्त्यावर उतरत असून रस्ता रोको आंदोलन करत आहे तरी आपण सकल मातंग समाजाने संघर्षाची तयारी ठेवावी लागेल. सकल मातंग समाज रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलनास सहभागी व्हावे. असे आवाहन संस्थापक अध्यक्ष सुरेश आप्पा भिसे यांनी केले आहे.
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.