“दरोडा व घरफोडीतील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.”
प्रतिनिधी :- रुपेश डोलारे धाराशिव
मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, सपोनि श्री. अमोल मोरे, सचिन खटके, पोह/1166 हुसेन सय्यद, पोह/1003 प्रदिप वाघमारे, मपोह/1318 शैला टेळे, पोना/1479 नितीन जाधवर, पोना/1611 बबन जाधवर, पोअं/1819 रवींद्र आरसेवाड चालक पोह/1253 संतोष लाटे, चालक पोअं/564 प्रशांत किवंडे असे धाराशिव जिल्ह्यातील मालाविषयक गुन्हेह्यातील आरोपीचा शोध घेवून मालाविषयक गुन्हे उघड व पाहिजे फरारी आरोपीचा शोध घेणे कामी पेट्रोलींग करीता रवाना होवून तामलवाडी येथे आले असता पथकास गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, इसम नामे पिंटु जगन्नाथ उर्फ जग्या भोसले, रा. कोरफळे ता. बार्शी जि. सोलापूर याने व त्याच्या अन्य साथीदारांनी धाराशिव जिल्हृयात बऱ्याच ठिकाणी चोऱ्या व दरोड्या सारखे गुन्हे केले असुन तो धाराशिव जिल्ह्यातील विविध गुन्ह्यात फरार आहे व तो सध्या वैराग मार्गे सोलापूर येथील पुणा नाका येथे आहे. अशी खात्रीलायक बातमी मिळाल्यावरुन पथकाने सदर ठिकाणी जावून बातमी मधील नमुद वर्णनाच्या इसमास ताब्यात घेवून त्याचे कडे गुन्ह्यासंबंधाने चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यास अधिक विश्वासत घेवून विचारपुस केली असता त्याने सागिंतले की, मी व माझे इतर सहा साथीदार यांनी मिळून तुळजापूर खुर्द गावालगत असलेल्या घरातुन रोख रक्कम 2,00,000₹ व सोन्याचे दागिने चोरी केल्याचे सांगीतल्याने गुन्हे अभिलेखाची पाहणी करता 1) पोलीस ठाणे तुळजापूर गुरनं 176/2024 कलम 395 भा.दं.वि.सं, पोलीस ठाणे धाराशिव ग्रामीण गुरनं 152/2023 कलम 395, 397 भा.दं.वि.सं.,258/2023 कलम 457, 380 भा.दं.वि.सं प्रमाणे गुन्हे नोंद असुन नमुद गुन्ह्यात पाहिजे आरोपी असल्याची खात्री झाल्याने दोन पंचा समक्ष नमुद आरोपीच्या ताब्यातुन नमुद गुन्ह्यातील एकुण 15,000 ₹ किंमतीची 3 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी दि. 26.06.2024 रोजी जप्त करुन पुढील कार्यवाही कामी नमुद आरोपीस तुळजापूर पोलीसांच्या ताब्यात दिले.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन. यांचे मार्गदर्शनाखाली सथानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. वासुदेव मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. अमोल मोरे, सचिन खटके, पोह/1166 हुसेन सय्यद, पोह/1003 प्रदिप वाघमारे,मपोह/1318 शैला टेळे,पोना/1479 नितीन जाधवर, पोना/1611 बबन जाधवर, पोअं/1819 रवींद्र आरसेवाड चालक पोह/1253 संतोष लाटे, चालक पोअं/565 प्रशांत किवंडे यांच्या पथकाने केली आहे.
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.