तुळजापूर तालुक्यातील येवती येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत, प्रवेशउत्सव व नवागताचे स्वागत.

 तुळजापूर तालुक्यातील येवती येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत, प्रवेशउत्सव व नवागताचे स्वागत.


प्रतिनिधी :- रुपेश डोलारे धाराशिव

दिनांक 15/06/2024 रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येवती येथे नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात प्रभात फेरीने अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली, चांगली सुरुवात म्हणजे अर्धे यश हमखास. नव्या जोमाने, उत्साहाने नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्यात आली,


तसेच प्रवेशोत्सव, नवागताचे स्वागत, पाठ्यपुस्तक वितरण,असे भरगच्च कार्यक्रम घेण्यात आले,यावेळी सर्व शालेय कमिटी, मुख्याध्यापक, व  शिक्षकवृंद उपस्थित होते.