बोळेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत, प्रवेशोत्सव व नवागताचे स्वागत

 बोळेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत, प्रवेशोत्सव व नवागताचे स्वागत.


 प्रतिनिधी :- रुपेश डोलारे धाराशिव.

आज दिनांक 15/06/2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव येथे नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात प्रभात फेरीने अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली,चांगली सुरुवात म्हणजे अर्धे यश हमखास. नव्या जोमाने, उत्साहाने नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्यात आली,


यामधे प्रवेशोत्सव, नवागताचे स्वागत, पाठ्यपुस्तक वितरण,अशा भरगच्च कार्यक्रम घेण्यात आले,याप्रसंगी गावचे प्रथम नागरिक सरपंच श्री. विलासजी पाटील. व सदस्य, तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. व्यंकट गोविंद रुपणुर, उपाध्यक्ष श्री. नामदेव किसन रूपणुर, श्री. प्रशांत सुखदेव सूर्यवंशी, कुंभार सर ,स्वामी सर, भोजने सर ख्याले सर,यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होते.