प्रेरणादायी लोकनेतृत्व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याबाब, शासन स्तरावर पाठपुरावा करणार.- आ, राणा जगजितसिंह पाटील.
प्रतिनिधी - रुपेश डोलारे धाराशिव
प्रेरणादायी लोकनेतृत्व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याबाबत आपण शासन स्तरावर पाठपुरावा करणार असून धाराशिव शहरातील अण्णा भाऊंच्या पुतळ्याचा विषय देखील लवकरच मार्गी लागणार असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी तुळजापूर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या भूमिपूजन प्रसंगी बोलताना दिली.
साठे चौक धाराशिव रोड येथे अण्णाभाऊंचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येत असून याचे क्ले मॉडेल तयार करण्यात आले आहे. ऑक्टोंबर पर्यंत पुतळ्याचे काम पूर्ण होणे अपेक्षित असून याठिकाणी बागबगीचा विकसित करण्यात येणार आहे. तसेच उपलब्ध जागेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी रु 5 कोटींचा प्रस्ताव दाखल करण्यात आला असून लवकरच यास मंजूरी अपेक्षित आहे.
तुळजापूर शहराचा चेहरा मोहरा बदलत असून शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करण्यात आला आहे. रेल्वे मार्ग, तामलवाडी एमआयडीसी, शहरांतर्गत रस्ते, बाग बगीचे, व्यायामशाळा यासह तुळजापूर विकास आरखड्याच्या माध्यमातून भरीव निधीची कामे केली जात आहेत. आगामी काळात भाविकांच्या संख्येत मोठी वाढ अपेक्षित असून दरवर्षी ७० ते ८० लाख असणारी भाविकांची संख्या ३ कोटी पर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे.
देशवासीयांनी आदरणीय मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून काम करण्याची संधी दिली आहे. पदभार स्वीकारताच त्यांनी शेतकरी सन्मान निधी व गरिबांसाठी वाढीव घरकुले असे लोककल्याणकारी निर्णय घेतले, यातून त्यांची सर्वसामान्यांच्या प्रति असलेली काटिबद्धता सिद्ध होते. सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी, युवकांना सक्षम बनविण्यासाठी शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येत असल्याचे यावेळी बोलताना ते म्हणाले.
याकामी माजी नगरसेवक किशोर साठे यांचा पाठपुरावा आहे.
यावेळी विनोद (पिटू भैय्या) गंगणे, संतोष बोबडे. सचिन रोचकरी. पंडितराव जगदाळे. विशाल रोचकरी. विजय कंदले, नरेश अमृतराव, चंद्रशेखर भोसले, नारायण नन्नवरे, शांताराम पेंदे, अमर हंगरगेकर, अविनाश धैर्यशील पाटील, बाळासाहेब शिंदे, औदुंबर कदम, शिवाजीराव गायकवाड, नानासाहेब लोंढे, विनोद पलंगे, अभिजीत कदम, शिवाजी गायकवाड ( जिल्हाध्यक्ष लहुजी शक्ती सेना), सुरज सगट जिल्हा सचिव, सुरेश भिसे, आनंद कंदले. सुनील शिरसागर ( अण्णा भाऊ साठे महामंडळ जिल्हा व्यवस्थापक), राकेश भांजी, गोरख पारदे. शिवाजी कांबळे. प्रकाश कांबळे. सुनील शिंदे. सतीश लोंढे. समाधान डोलारे. दत्ता भांजी. ओमकार कसबे. आकाश शिंदे. चंद्रकांत भोसले. विशाल कांबळे. कुंडलिक शेंडगे. दत्ता पेठे. गैबू बोराडे. मारुती लोंढे. अमोल देडे. तसेच मातंग समाज तालुक्यातून मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.