डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ उपकेंद्र उस्मानाबाद येथे भारतीय युवा शक्ती ट्रस्ट या सामाजिक संस्था अंतर्गत युवकांना व महिलांना उद्योजकता विकास या घटकावर प्रशिक्षण

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ उपकेंद्र,उस्मानाबाद (धाराशिव) येथे भारतीय युवा शक्ती ट्रस्ट या सामाजिक संस्था अंतर्गत युवकांना व महिलांना उद्योजकता विकास या घटकावर प्रशिक्षण


 प्रतिनिधी :- रुपेश डोलारे धाराशिव.

दिनांक 28 जून 2024 रोजी 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ उपकेंद्र उस्मानाबाद,(धाराशिव) येथे भारतीय युवा शक्ती ट्रस्ट या सामाजिक संस्था अंतर्गत युवकांना व महिलांना उद्योजकता विकास या घटकावर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी विद्यापीठ उपकेंद्र येथील मॅनेजमेंट विभागाचे डायरेक्टर श्री सुयश अमृतराव सर , उद्योजक देशमाने साहेब , महिला उद्योजक सौ देशमुख मॅडम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्तावित शाखाप्रमुख विठ्ठल तिकांडे यांनी केले कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून महिला पुरुष , तरुण उद्योजक व प्रकल्प अधिकारी समीर शेख व आयेशा मुलानी उपस्थित होते. प्रकल्पाचे अधिकारी नितीन राठोड आभार प्रदर्शन केले.