बोळेगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या संरक्षक भिंतीचे बांधकामाचे भूमिपूजन.

 बोळेगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या संरक्षक भिंतीचे बांधकामाचे भूमिपूजन.

प्रतिनिधी :- रुपेश डोलारे धाराशिव

दिनाक,२८ जून २०२४ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बोळेगाव येथे शाळेच्या संरक्षक भिंतीचे (wall compound)

बांधकामाचे भूमिपूजन व उद्घाटन गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री. अशोक बाजीराव रुपनूर यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी बोळेगावचे सरपंच मा. श्री. विलास पाटील, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. व्यंकट रुपनूर, उपाध्यक्ष श्री. प्रशांत सूर्यवंशी, माजी अध्यक्ष श्री. नारायण रुपनूर, ग्रा. पं. सदस्य श्री. सुनिल सुर्यवंशी, श्री. अंकुश रुपनूर तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.