ऊस तोडणी फसव्या मुकादमाकडून झालेल्या फसवणुकीबाबत,महाराष्ट्र ऊस वाहतूक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे, 15 ऑगस्ट रोजी, नळदुर्ग येथील बोरी धरणावर जलसमाधी आंदोलन.

प्रतिनिधी :- रुपेश डोलारे धाराशिव

आज दिनाक,१८ जुलै २०२४ रोजी, धाराशिव जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की, आम्ही ग्रामीण भागातील शेतकरी कुंटुंबातील असून शेतीला जोडधंदा म्हणून आम्ही 20 वर्षापासून ऊस वाहतुकीचा व्यवसाय करतो. परंतु अलिकडच्या काळात मुकादमने फसवणुक केल्यामुळे आमचा ऊस वाहतुकीचा धंदा संपूष्टात येऊन आमच्यावर साखर कारखान्याने 138,420 प्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे आमच्या कुटुंबावर उपास मारीची वेळ आली आहे. आम्ही वारंवार संघटनेमार्फत शासनास कळवून देखील शासन आमची कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही. नागपूर येथील हिवाळी अधिविशेनात मा. अजित दादा पवार साहेब, मा. बबन दादा शिंदे साहेब, मा.शशिकांतजी शिंदे साहेब यांनी अधिवेशनात विषय मांडुन देखील त्याचा उपयोग झाला नाही. गळीत हंगाम 2021- 2022 या वर्षी माढा तालुक्यातील आमचा एक ऊस वाहतुक ठेकेदाराचा मुकादमने निघृण खून केला. अशी मुकादमची मुजोरी वाढत चालली तर येथून पुढील काळात साखर कारखाने चालविणे अशक्य होईल,


मागण्या पुढील प्रमाणे

1. ज्या फसवीगीर मुकादमने फसविले आहे. त्या मुकादमवर वाहतुक ठेकेदाराच्या तालुका पोलीस ठाणे येथुन गुन्हा नोंद करण्यात यावा.


2. ज्या मुकादमने वाहतुक ठेकेदाराला फसविले आहे व साखर कारखान्याने त्या वाहतुक ठेकेदारावर गुन्हे दाखल केले आहेत. त्या सर्व वाहतूक ठेकेदाराच्या केसेसला जोपर्यंत मुकादमकडून वसूली होत नाही तोपर्यंत त्या केसेसला स्थगीती मिळावी,


3. शासनाने मुकादमावर कडक कार्यवाही करुन आमच्या रकमेची वसुली करुन ती साखर कारखान्यास भरावी. आमची काहीही हरकत नाही.


4. मुकादमाने फसवणूक केलेली शासनाने त्याच्या मालमत्तेवर बोजा चढवून आमची कर्ज माफी करावी. संबंधीत साखर कारखाने, बँका, पतसंस्था, वित्त संस्थेकडून ऊस वाहतुक दाराकडून कर्जाची मागणीची स्थगीती दयावी.


5. वरील कोणत्याही प्रकारचे नाही जमल्यास आमची शासनाने कर्ज माफ करावे.


तरी मा. साहेब वरील बाबीचा विचार करुन अर्ज मिळाल्यापासून 15 ते 20 दिवसात विचार नाही झाल्यास दि. 15 ऑगस्ट 2024 रोजी तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील बोरी धरण येथे जल समाधी घेणार आहोत. कारण असे निर्दयी जीवण जगण्यापेक्षा मेल्याले बरे, कारण या उभ्या महाराष्ट्रात शेतकऱ्याचा व व्यवसायकाचा कोणीही लोक प्रतिनिधी शासन नाही. असे म्हणावे लागेल. बोरी हे धरण तुळजापूर तालुक्यात असल्याने आम्ही तेथे जल समाधी घेणार आहे. तरी मा. साहेबांनी वरील सर्व बाबीचा विचार करुन योग्य तो शेतकरी पुत्राला न्याय दयावा,असे दिलेले निवेदनात नमूद करण्यात आले आहे, या निवेदनावर राजगौंड सुरर्गोंड पाटील, सांगली महाराष्ट्र राज्य अध्यक्ष,मोहन सोपान भोसले, धाराशिव जिल्हाध्यक्ष,रमजान कासिम इनामदार,सोलापूर जिल्हाध्यक्ष,दिलीप पुरुषोत्तम कटारे,बिभीषण सोपान कोकाटे,राजेंद्र गोरोबा गोंडगीरे,किरण कालीदास कोकरे,याकुब जिलानी अनसारी,सचिन श्रीमंत हिंगमीरे,इंद्रजीत रघुनाथ कोळेकर,रणजीत तानाजी नन्नवरे,व इतर पदाधिकारी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.