सोलापूर येथे युवा भिम सेना सामाजिक संघटनेच्या, एक दिवशी धरणे आंदोलनास, भिम-अण्णा सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य,यांचा जाहीर पाठिंबा.

सोलापूर येथे युवा भिम सेना सामाजिक संघटनेच्या, एक दिवशी धरणे आंदोलनास, भिम-अण्णा सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य,यांचा जाहीर पाठिंबा.



प्रतिनिधी :- रुपेश डोलारे धाराशिव


 आज दि.15/07/2024 रोजी सोलापूर येथे युवा भिम सेना सामाजिक संघटना (महाराष्ट्र राज्य) एक दिवशीय धरणे आंदोलनास भिम अण्णा सामाजिक संघटना (महाराष्ट्र राज्य) यांचा जाहीर पाठिंबा देण्यात आला.


सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यामधील महूद येथे गुरुवार, दिनांक 11 जुलै 2024 रोजी सुनील कांबळे या तरुणाची त्याच गावातील हिंन्दू सुवर्ण समाजातील दोन तरुणांकडून मातंग समाज मंदिरासमोर येऊन कोयत्याने वार करून निर्गुण हत्या करण्यात आली आहे. सुनील कांबळे यांच्या कुटुंबाला दहा लाख रुपये आर्थिक मदत देण्यात यावी. सुनील कांबळे यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. यांच्या कुटुंबियांना योग्य तो न्याय देण्यात यावा.ऐक दिवसीय धरणे आंदोलनास भिम-अण्णा सामाजिक संघटना यांच्यावतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला.

यावेळी उपस्थित भिम अण्णा सामाजिक संघटना (महाराष्ट्र राज्य) 

संस्थापक अध्यक्ष :- सुरेश (आप्पा) भिसे, राम (भाऊ) कांबळे, मयूर (भाऊ) साळुंके, जयराज (भाऊ) झोंबाडे, तुषार भिसे,करण झोंबाडे,संकेत देडे, नागू भिसे इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.