सामाजिक वनीकरण तुळजापूर कार्यालयाच्या वतीने, शहरांमधून वृक्षदिंडी

 


प्रतिनिधी :- रुपेश डोलारे धाराशिव

आज,दिनाक १९ जुलै २०२४, रोजी सामाजिक वनीकरण तुळजापूर कार्यालयाच्या वतीने जिल्हा परिषद कन्या प्रशाला तुळजापूर या शाळेच्या 310 विद्यार्थींनी समवेत तुळजापूर शहरांमधून वृक्षदिंडी मध्ये एक पेड मा के नाम, झाडे लावा झाडे जगवा, ह्या घोषणा देण्यात आल्या, सदर वृक्षदिंडी यावेळी  


विभागीय वनअधिकारी साहेब करे साहेब वन क्षेत्र पाल पचरंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिमंडळ अधिकारी सामाजिक वनीकरण तुळजापूर एस बी. देशमुख साहेब एस. एम.पांचाळ एस. एल. भोजने वक्ष मित्र मुलानी सर नगरसेवक राहुल भैया खपले सामाजिक कार्यकर्ते नवनाथ जगताप मुख्याध्यापक गाडे सर इत्यादी उपस्थित होते सदरील वृक्ष दिंडी मधून नागरिकांना हरित चळवळी विषयी जनजागृती करण्यात आली सामाजिक वनीकरण विभाग तुळजापूर यांनी हंगरगा रोपवाटिका या ठिकाणी नेम करंज पेरू सिताफळ इत्यादी प्रकारची 5.00 लाख रोपे संगोपन केल्याचे आढळून आले सदरील रोपे नागरिकांस सवलतीच्या दरात घेण्यात येत आहेत.