राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे यांची जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये उपस्थीती व प्रश्नांचा भडीमार.

प्रतिनिधी :- रुपेश डोलारे धाराशिव

धाराशिव जिल्हा नियोजन समितीची (दि.18) बैठक पार पडली या बैठकीसाठी धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री रामा ना तानाजीराव सावंत साहेब, जिल्हाधिकारी मा. सचिन ओंम्बासे साहेब, खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, आ. विक्रम काळे, आ.राणा जगजीतसिंह पाटील, आ.ज्ञानराज चौगुले,आ.कैलास पाटील तसेच शासनाच्या सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.



राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये विविध प्रश्नांचा भडीमार केला.या बैठकीमध्ये सर्व विषयानुरूप चर्चा करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य महेंद्र काका धुरगुडे या बैठकीसाठी उपस्थित होते. यांनी या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे मांडले त्या अनुषंगाने पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी ते मान्य केले. जिल्हाध्यक्ष यांच्या प्रश्नांनी आजची जिल्हा नियोजन समितीची बैठक वादळी ठरून प्रशासनाला या विषयी जाग आली.


धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यात महावितरण मार्फत वर्ष 2024 एम्प्लॉयमेंट टेंडर प्रक्रियेत झालेल्या गैरप्रकाराबद्दल जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य महेंद्र काका धुरगुडे यांनी पालकमंत्री यांच्यासमोर डीपीडीसी बैठकीमध्ये सर्व माहिती सांगितली. यामध्ये धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यात महावितरण मार्फत वर्ष 2024 टेंडर प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने झाली असल्याने संबंधित एजन्सीने तक्रार केली होती त्या अनुषंगाने बऱ्याच गोष्टी चुकीच्या पद्धतीने झाल्याचे निदर्शनास आले आहे. व ही निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे म्हणजेच या मध्ये गैरप्रकार झाल्याचे सिद्ध होते. या निविदा प्रक्रियेत सहभागी असणारे अधिकारी, ऑडिट विभागातील कर्मचारी व इतर कर्मचारी यांना निलंबित करण्यात यावे तसेच जे ठेकेदार चुकीच्या कागदपत्राच्या आधारे निविदा प्रक्रियेत सहभागी होऊन चुकीच्या पद्धतीने पात्र झालेले आहेत त्यांना काळे यादी टाकून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या डीपीडीसी बैठकीमध्ये करण्यात आली. यावर पालकमंत्री महोदयांनी कारवाई करण्याचे आदेश दिले.


महाराष्ट्र शासनाच्या वतीने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू करण्यात आली आहे त्या धर्तीवर धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह सर्व राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे शून्य बॅलन्स वरती खाते उघडण्याचे संबंधित बँकांना आदेश देण्याचे व ही प्रक्रिया चालू करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांसह पालकमंत्री यांनी मान्य केले. 

तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत धाराशिव जिल्ह्यामधून किती फॉर्म जमा झाले याची माहिती शासनाने कळवावी व जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ व्हावा यासाठी तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांनी लाभार्थ्यांना लागणारी कागदपत्रे लवकरात लवकर देऊन सहकार्य करावे असे पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना या बैठकीमध्ये मागणी केली व ती मागणी मान्य करण्यात आली. 

शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना सिविल स्कोर न तपासता त्यांना तात्काळ पीक कर्ज देण्यात यावे व आज पर्यंत शेतकऱ्यांना किती पीक कर्ज दिली याची माहिती द्यावी व कोणत्या बँकांनी शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत पीक कर्ज दिले नाही अशा बँकांमध्ये शासनाचे असलेले खाते काढून घेण्यात यावे.व त्या बँकांवर प्रशासनाच्या वतीने कारवाई करावी. त्याचप्रमाणे ज्या बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देत नाहीत व लीड बँकेने ठरवून दिलेले उद्दिष्ट पूर्ण करीत नाहीत अशा बँकांना कारवाई करण्याचे लीड बँक मॅनेजरला आदेशित करावे अशी मागणी करण्यात आली. यावर प्रशासनाच्या वतीने कार्यवाही करू असे सांगण्यात आले.

 एकंदरीत आज पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये जिल्हा नियोजन समितीचे सदस्य यांनी सहभाग नोंदवून आपली उपस्थिती दाखवून दिली.यावेळी भूम परंडा वाशी विधानसभा अध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य नवनाथ आप्पा जगताप जिल्हा नियोजन समिती सदस्य महेश नलावडे व इतर सदस्य उपस्थित होते.