अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती च्या वतीने श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान यांना निवेदन.

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती च्या वतीने श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान यांना निवेदन.



प्रतिनिधी :- रुपेश डोलारे धाराशिव

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती च्या वतीने श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान यांना निवेदन देण्यात आले या निवेदनातश्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर येथे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने गेल्या पाच ते दहा वर्षापासून कामावर असणाऱ्या गावातील नागरिकांना कायमस्वरूपी कामावर घेण्याबाबत तसेच तुळजापुरातील गावकऱ्यांना वेळेचे बंधन न घालता आधार कार्ड तपासून थेट दर्शनास सोडण्याबाबत आदरणीय मुख्यमंत्री साहेब व जिल्हा अधिकारी साहेब धाराशिव व तहसीलदार साहेब मंदिर संस्थान तुळजापूर यांना निवेदन देण्यात आले, यावेळी उपस्थित धाराशिव जिल्हाध्यक्ष गणेश भैय्या पाटील, तुळजापूर तालुकाध्यक्ष बालाजी जाधव, तुळजापूर तालुका कार्याध्यक्ष बाळासाहेब पाटील, तुळजापूर तालुका सरचिटणीस अथलेश पुराणिक इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.