डॉ. हेडगेवार रक्तपेढी सोलापूर यांच्या ३४ व्या वर्धापन दिनानिमित्त देण्यात येणारा सर्वोत्कृष्ट रक्त संकलन पुरस्कार, तुळजापूर तालुक्यास प्राप्त. रक्तदान चळवळीत तुळजापूर प्रथम.

प्रतिनिधी रुपेश डोलारे,धाराशिव

तुळजापूर -(दि.२८) डॉ. हेडगेवार रक्तपेढी सोलापूर यांच्या ३४ व्या वर्धापन दिनानिमित्त देण्यात येणारा सर्वोत्कृष्ट रक्त संकलन व यशस्वी शिबिरे पुरस्कार तुळजापूर तालुक्यास प्राप्त झाला आहे.

   वार्षिक वर्ष २०२३-२४ मध्ये तुळजापूर तालुक्यातील एकूण २५ शिबिराच्या माध्यमातून १२०५ रक्तसंकलन स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले.

   यामध्ये तुळजापूर शहरातील युवास्पंदन सामाजिक संस्था, दयावान ग्रुप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ,आर्ट ऑफ लिविंग, विधीज्ञ मंडळ, आघाडीवर आहेत.

   सदरील संस्थेस रक्तपेढीच्या ३४ व्या रक्तदाता कृतज्ञता समारंभ समारंभात व स्नेह मेळाव्यात सोलापूरचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार, जी.एस.टी चे अधीक्षक तथा राष्ट्रपती पुरस्कार विजेते अजित लिमये व राष्ट्रीय संरक्षण स्वयंसेवक संघ पश्चिम महाराष्ट्र प्रांत सेवा कार्यप्रमुख शैलेंद्र बोरकर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले..


  या पुरस्काराचा स्वीकार युवास्पंदन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महेंद्र कावरे सचिव दयावान ग्रुपचे अमोल कुतवळ, शहाजी कावरे अॅड. संजय पवार, सुभाष शिंदे , ऋतुजा कुलकर्णी, स्वरांजली पवार यांनी स्वीकारला.

अमोल कुतवळ यांनी तुळजापूर शहरातील रक्तदात्यांचे आभार मानुन तरूणांनी रक्तदान चळवळीत सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन त्यांनी केले.

-------------------------------------------------

 *२०२३-२४ रक्तदाता पुरस्कार सारंग कावरे व विश्वजीत डोईफोडे यांना प्रदान करण्यात आला.*

----------------------------------------------

यावेळी रक्तपेढीचे अध्यक्ष रमेश विश्वरूपे सचिव सत्यनारायण गुंडला संचालक नितीन कवठेकर व्यवस्थापक रंगनाथ जोशी जनसंपर्क अधिकारी दिलीप बनसोडे उपस्थित होते.