उमरगा येथे सातलिंग स्वामी यांचा स्वेच्छासेवानिवृत्ती निमित्त बच्चु भाऊ कडू यांच्या हस्ते जाहिर सत्काराचे आयोजन. ( जिल्हा कर्मचारी संघटना व मित्र परिवाराच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन )
आगामी उमरगा लोहारा विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक लढवण्यासाठी धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये वरिष्ठ सहाय्यक या पदावर कार्यरत असलेले सातलिंग स्वामी यांनी आपल्या शासकीय सेवेचा राजीनामा देऊन मुदतपुर्व स्वेच्छासेवानिवृत्ती घेतली आहे. त्या निमित्त त्यांच्या जाहीर सत्काराचा कार्यक्रम श्री 108 सिद्धलिंग शिवाचार्य महास्वामी हिरेमठ संस्थान आळंद,श्री 108 डॉ शांतवीरलिंग शिवाचार्य महास्वामी हिरेमठ संस्थान औसा आणि लोहारा तालुक्यातील श्री 108 अभिनव सूतरेश्वर महास्वामी हिरेमठ संस्थान अचलेर यांच्या दिव्य सानिध्यात आणि दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष ( कॅबिनेटमंत्री दर्जा ) ओमप्रकाश उर्फ बच्चु ( भाऊ ) कडू यांच्या हस्ते दिनांक 29 जुलै 2024 रोजी उमरगा येथील शांताई मंगल कार्यालय, छत्रपती शिवाजी महाविद्यालयासमोर मेन रोड येथे सकाळी 11 वाजता संपन्न होणार आहे.
या भव्य सोहळ्यास प्रमुख उपस्थिती सोलापूर येथील माजी आमदार शिवशरण पाटील बिराजदार, संभाजी ब्रिगेड प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार, धाराशिव जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा गोदावरी केंद्रे, जि. प. कृषी व पशुसंवर्धन माजी सभापती अॅड. दिपक अलुरे, भाजप जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, धाराशिव युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष आश्लेष मोरे, प्रहार पक्ष जिल्हाध्यक्ष वर्षद शिंदे, प्रहार दिव्यांग संघटनेचे धाराशिव जिल्हाध्यक्ष मयूर काकडे, भारतीय माजी सैनिक संघटना जिल्हाध्यक्ष शहाजी चालूक्य, मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष तुषार पाटील, माजी जि. प. विरोधी पक्ष नेते शरण पाटील, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अनंत मुगळे, उमरगा बार कौन्सील अध्यक्ष अॅड. गोविंद गायकवाड, मुस्लिम जमात कमिटीचे बाबा औटी, शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचे उमरगा तालुकाध्यक्ष संजय पवार, वीरशैव सभा जिल्हाध्यक्ष प्रफुलकुमार शेटे, लोहारा माजी नगराध्यक्ष दिपक मुळे, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष शरद पवार, तालुकाध्यक्ष अण्णासाहेब पवार, धाराशिव जि. प. माजी बांधकाम सभापती गोविंद पवार, कम्युनिस्ट नेते अरुण रेणके, पोलीस पाटील संघटना तालुकाध्यक्ष महेशंकर पाटील, विजय बोरसे, विजय काका जाधव, हरीश डावरे, रामचंद्र आलूरे, शिवराज पाटील, सुनील साळुंके, सुरेश हरीशचंद्र पवार, शकुंतला मोरे, बालाजी यादव, संतेश्वर ढोबळे, तानाजी मोटे, अॅड. सय्याजी शिंदे, अमर वाले, सामाजिक कार्यकर्ते अॅड. शितल चव्हाण, महंतय्या स्वामी, संजय गिराम आदिंसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.
या सोहळ्यास उमरगा लोहारा तालुक्यातील बहुसंख्य दिव्यांग बंधू भगिनीं, शेतकरी, मजूर, कामगार, कर्मचारी वर्ग उपस्थित राहणार असून सदर कार्यक्रमास उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघासह पंचक्रोशीतील नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन धाराशिव जिल्हा कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.