तुळजापूर शहरामधील विशेष सहाय्य योजनेच्या ( संजय गांधी/इंदिरा गांधी/ श्रावणबाळ योजना) लाभार्थ्यांना आधार अपडेट करण्यासाठी तुळजापूर तहसील कार्यालय येथे कॅम्प.


 प्रतिनिधी :- रुपेश डोलारे धाराशिव

तुळजापूर शहरामधील विशेष सहाय्य योजनेच्या ( संजय गांधी/इंदिरा गांधी/ श्रावणबाळ योजना) लाभार्थी यांना कळविण्यात येते की ,दिनांक 16/07/2024 ते दिनांक 19/07/2024 रोजी आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तहसिल कार्यालय तुळजापूर येथे कॅम्प आयोजित केला असून त्यामध्ये लाभार्थी यांनी आपले आधार कार्ड अपडेट करुन घ्यावे अन्यथा अनुदानाची रक्कम पुढील महिन्यापासून दिली जाणार नाही.याची नोंद घ्यावी,असे आवाहन तुळजापूर सज्जाचे तलाठी,भातभागे यांनी केले आहे.