ऑफलाइन धान्य वितरित करण्यात यावे या मागणीसाठी, मा,नगरसेवक राहुल (भैय्या) खपले,यांचे जिल्हा पुरवठा अधिकारी यांना निवेदन

प्रतिनिधी :- रुपेश डोलारे धाराशिव

लाडकी बहिण उपाशी.

आज दिनाक,३१ जुलै २०२४ रोजी धाराशिव जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती.शेंडे मॅडम यांना जिल्हातील रेशन दुकानात ई-पॉस मशीन बंद असल्या मुळे,जुलै महिन्याचे रेशन मिळाले नसल्या मुळे आमची लाडकी बहिण उपाशी आहे,तरी ऑफ लाईन पध्दतीने धान्य वितरण करण्यात यावे, हे निदर्शनास आणून देण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.लवकर वाटप न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.या प्रसंगी शिवसेना *उद्धव बाळासाहेब ठाकरे* पक्षाचे नगरसेवक राहुल भैय्या खपले, नवनाथ आप्पा जगताप, गणेश छत्रे ,अमोल जाधव आदी उपस्थित होते.