तेरणा प्रकल्पाच्या उजव्या व डाव्या कालवा दुरुस्तीचे काम सुरू असून आगामी रब्बी हंगामात पिकांसाठी कालव्याद्वारे पाण्याची आवर्तने मिळावीत यासाठी आवश्यक ती सर्व कामे वेळेत पूर्ण करून घेण्याच्या सूचना आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
तेरणा कालवा विशेष दुरुस्तीच्या कामासाठी आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नातून रु. 3.41 कोटी निधी मंजूर करण्यात आला होता. या कामाची पाहणी करून त्यांनी कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. ठाकरे सरकारच्या काळात अनेकदा मागणी करूनही या कालव्यांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला नव्हता. मात्र महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांनी यासाठी निधी उपलब्ध करून दिला.
तेरणा प्रकल्पावरील डाव्या व उजव्या कालव्याची एकूण लांबी ३२ कि.मी. असून याद्वारे तेर, रामवाडी, डकवाडी, इर्ला, दाऊतपूर, कोळेवाडी व भंडारवाडी या गावांतील १६५२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. सदरील कामे वेळत व दर्जेदार करून आगामी रब्बी हंगामात शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती सर्व कामे पूर्ण करून घेण्याच्या सूचना आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी जल्पसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
या रब्बी हंगामात कालवा दुरुस्ती करून शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्यात येणारच आहे, तसेच पाईपलाईन द्वारे सिंचनाच्या पथदर्शी प्रकल्पातील तांत्रिक दोष दूर करून योजना पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
यावेळी तेर ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्री.श्रीमंत फंड, श्री.नवनाथ नाईकवाडी, श्री.विठ्ठल लामतुरे, श्री.पद्माकर फंड, श्री.प्रतीक नाईकवाडी, श्री.रामा कोळी, श्री.नवनाथ पसारे, श्री.अनिल टेळे, श्री.किशोर काळे, श्री.मंगेश फंड, श्री.अर्शाद मुलानी, श्री.संजय लोमटे यांच्यासह धाराशिव पाटबंधारे विभाग क्र १ चे कार्यकारी अभियंता ए. एम. मदने, उपविभागीय अभियंता श्री डी .एम. नाईकनवरे, शाखा अभियंता श्री डी. सी. वरपे आदींची उपस्थिती होती.
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.