तुळजापूर येथील जगदाळे कॉम्प्लेक्स येथे,पार्किंगची व्यवस्था करा- आनंद (मालक) जगताप यांची निवेदनाद्वारे मागणी.

 

प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव

उपविभागीय अधिकारी व पोलीस निरीक्षक तसेच  मुख्याधिकारी न प तुळजापूर  यांना आज निवेदन देण्यात आले , दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की,येणाऱ्या तीन ऑक्टोंबर पासून शारदीय नवरात्र महोत्सव सुरू होत आहे, दिनांक ३ ते १८ ऑक्टोबर पर्यंत नवरात्र महोत्सव संपन्न होणार आहे,जवाहर चौक, कमान वेस, व आर्य चौक या भागात सर्वाधिक जास्ती महाराष्ट्रसह, आंध्र प्रदेश, कर्नाटक, व तेलंगाना ,या भागातील भक्तांची संख्या प्रचंड असते तरी या  भाविकांच्या पार्किंगची व्यवस्था जगदाळे कॉम्प्लेक्स व उद्धवराव सभागृह येथे करण्यात यावी जेणेकरून त्या भाविकांना आपल्या पारंपरिक पुजाऱ्याकडे जाता यावे, कारण की जवाहर चौक कमान वेस व आर्य चौक  या भागातील सर्वात जास्त पुजाऱ्यांची वस्ती आहे,  पार्किंगची व्यवस्था लांब असल्याने भक्तांना पायपीट करण्याकरिता त्रासाला सामोरे जावे लागते, ती होऊ नये म्हणून,

आज  निवेदन देण्यात आले याप्रसंगी श्री रणजीत भैय्या इंगळे, आनंद मालक जगताप,श्रीकांत आप्पा रसाळ,गणेश पिंटू अणदूरकर ,गणेश आप्पा इंगळे, केदार पांढरे, बाळासाहेब धुमाळ,अमोल कदम, उपस्थित होते.