“ ९ वर्षीय मुलीवर लैंगीक अत्याचार, तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव.

तुळजापूर पोलीस ठाणे :एका गावातील एक 9 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय)दि. 16.09.2024 रोजी 17.00 वा.सु. ही किराणा दुकानात कुरकुरे आणण्यासाठी गेली असता गावातील एका तरुणाचे तिस घरात बोलावून तीच्यावर लैंगीक अत्याचार केला. घडल्या प्रकाराची कोठे वाच्यता केल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली,अशा मजकुराच्या पिडीतेची आईने दि. 17.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं. कलम- 64(2)(i), 65(2), 75(1), 351(2) सह कलम 4, 8,10,12 बा.लै.अ.अधि 2012 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.