कृषी उत्पन्न बाजार समिती तुळजापूर यांच्याकडून शेतकरी बांधवांना जाहीर सूचना

 


प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव

तुळजापूर :- कृषी उत्पन्न बाजार समिती तुळजापूर तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव कार्यालयाकडून शेतकऱ्यांसाठी सूचना आवारा बाहेरील शेतीमाल खरेदी विक्री व्यवहारातील फसवणूक टाळण्यासाठी तसेच शासनामार्फत वेळोवेळी जाहीर होणाऱ्या विविध शेतमाल अनुदान योजनांसाठी समस्त शेतकरी बांधवांनी आपला शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समितीचे मार्केट यार्डतच विक्री करावा,

शेतमालाला जास्तीत जास्त व चांगला दर मिळण्यासाठी शेतकरी बांधवांनी आपला शेतमाल वाळवून व स्वच्छ करून काडीकचरा विरहित शेतमाल विक्रीसाठी आणावा शेतकऱ्यांना विनंती की शेतमालाची विक्री झाल्यानंतर संबंधित अडत्याकडून हिशोब पट्टीच्या छापील व प्रमाणित पावत्याच घेण्यात याव्यात कोणत्याही प्रकारची खोरी पांढरे व अ प्रमाणेच पावती घेऊ नये जेणेकरून प्रमाणित पावत्या अभावी फसवणूक टाळता येईल.