श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनास येणाऱ्या भाविकांना राजे शहाजी महाव्दारा मधुन प्रवेश देणे बाबत शहरवासीय यांचे निवेदन


प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव

शारदीय नवरात्र महोत्सव 2024 मध्ये भाविकांसाठी मंदिराचे मुख्य महाव्दार बंद करून पार्किंग मधुन प्रवेश देण्यात आला होता, तशी नोटीस मंदिर संस्थानने काढली होती. त्यामध्ये दि.02/10/2024 ते 18/10/2024 रात्री 12 वाजेपर्यंत भाविकांना पार्किंग मार्गे मंदिरात प्रवेश दिला जाणार होता. परंतु काल अचानक मंदिर संस्थानने तो कालावधी वाढवून दि.22/10/2024 पर्यंत पार्किंग मार्गेच प्रवेश देणार असल्याचे नोटीसव्दारे कळविले आहे.




पार्किंगमध्ये तात्पुरता दर्शन मंडप उभा केला गेला होता. तो आता काढण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे भाविकांना पार्किंग मार्गे प्रवेश देणे धोक्याचे ठरत आहे. तसेच मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. तसेच काळभैरव मंदिरा समोरील पायऱ्यांवरून येण्यास अपंग व वृध्द भाविकांना खुप त्रास सहन करावा लागत आहे.

त्याच बरोबर पर्वणी काळामध्ये गोमुख तिर्थ व कल्लोळ तिर्थाच्या स्नानाचे महत्व असुन त्यापासुन भाविक वंचीत राहत आहेत.



तरी याव्दारे मा. साहेबांना नम्र विनंती करण्यात येते की, भाविकांना होणारा त्रास पाहता भाविकांना त्वरीत राजे शहाजी महाव्दारामधुन दर्शनासाठी प्रवेश देण्यात यावा असे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे,

या निवेदनावर इंद्रजीत साळुंके,बाळासाहेब भोसले,लखन पेंदे,अण्णासाहेब क्षीरसागर,श्रीकृष्ण साळुंके,आप्पा पवार,सूर्या कदम,किरण कदम,गोपाळ पवार खंडू टोले पुजारी व व्यापारी बांधव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.