एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय तुळजापूर, कनिष्ठ सहाय्यक व अंगणवाडी सेविका, १०,००० रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात


प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव

यशस्वी सापळा कारवाई अहवाल

 दि. 18/10/2024


▶️ युनिट - धाराशिव


▶️ तक्रारदार- पुरुष, वय-37 वर्षे.


▶️ आरोपी लोकसेवक -

1) श्रीमती मई बळीराम खांडेकर , वय-34 वर्षे, 

पद- कनिष्ठ सहाय्यक,एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय,ता.तुळजापूर जि. धाराशीव.

( वर्ग-०३)

आरोपी लोकसेवक -

2) श्रीमती सोनाली संदीप कदम , वय-28वर्षे, 

पद- अंगणवाडी सेविका, मौजे चिंचोली, तालुका तुळजापूर , धाराशिव. रा. चिंचोली, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव. 


▶️ लाच मागणी रक्कम - 

    15,000/- रुपये लाच रक्कमेची मागणी करुन तडजोड अंती 10,000/- रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य केले. 


▶️ लाच पडताळणी दिनांक -18/10/2024 

     

▶️ लाच स्वीकारली दिनांक -

18/10/2024


▶️ लाच स्विकारली रक्कम - 10,000/- रुपये 

 

▶️ कारण-यातील आलोसे क्रमांक 01 व आलोसे क्रमांक 02 यांनी यातील तक्रारदार यांचे पत्नीचे मौजे चिंचोली, तालुका-तुळजापुर येथे अंगणवाडी मदतनीस म्हणून नियुक्ती पत्रावर वरिष्ठांची सही घेऊन ऑर्डर देण्यासाठी पंच साक्षीदारासमक्ष तक्रारदार यांचेकडे 15,000 /- रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती 10,000/- रुपये लाच रक्कम स्विकारण्याचे मान्य करुन यातील आलोसे क्रमांक 01 यांनी पंचासमक्ष सदरची लाच रक्कम स्वतः स्विकारली असता आलोसे क्रमांक 1) व आलोसे क्रमांक 2) याना ताब्यात घेण्यात आले असुन पोलीस ठाणे तुळजापूर , जिल्हा धाराशीव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.


▶️ सापळा अधिकारी-

श्री. विकास राठोड, 

पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. धाराशिव युनिट.

मो.नं.99222 07499.


▶️*सापळा पर्यवेक्षण अधिकारी-

श्री. सिद्धाराम म्हेत्रे , पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. धाराशिव युनिट.

मो.नं. 9594658686.


▶️ मार्गदर्शक अधिकारी -

श्री संदीप आटोळे

पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, छत्रपती संभाजीनगर.

मो.नं.9923023361


 ▶️ श्री. मुकुंद आघाव 

अपर पोलीस अधीक्षक,

ला.प्र. वि, छत्रपती संभाजीनगर 

मो.नं. 9881460104


▶️ सापळा पथक- 

पोलीस- अमलदार मधुकर जाधव, विशाल डोके, जाकीर काझी व चालक दत्तात्रय करडे 

================

सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*

*अँन्टी करप्शन ब्युरो, धाराशिव

@ दुरध्वनी क्रं. 02472-222879*

*@ टोल फ्रि क्रं. 1064