सांगवी मार्डी येथे स्वर्गीय शेठ गुलाबचंदजी लादुरामजी तोष्णीवाल यांच्या पुण्यतिथी निमित्त,जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिबिर संपन्न.


प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव.

स्वर्गीय शेठ गुलाबचंदजी लादुरामजी तोष्णीवाल यांच्या पुण्यतिथी निमित्त व रोटरी ई क्लब ऑफ सोलापुर ईलाईट यांचे संयुक्त विद्यमाने जि प प्रा शा सांगवी मार्डी ता तुळजापूर येथे दिनांक 18 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 03.00 वा. विद्यार्थ्यांचे दातांची तपासणी शिबिर आयोजित केलेले होते.

या शिबिरामध्ये रो.डॉक्टर सौरभ ढोपरे सर यांनी दातांची निगा कशी राखावी याबद्दल मार्गदर्शन केले व तसेच दंत तपासणी हि करण्यात आली. रोटरी ई क्लब ऑफ सोलापुर ईलाईट चे अध्यक्ष रो.सचिन तोष्णीवाल सेक्रेटरी रो. आदर्श गोयदानी खजिनदार रो. अल्पेश साबू Ipp Rtn.PHF व्यंकटेश सोमानी व रो. बालमुकुंद राठी रो.अजय डोईजोडे यांची विशेष उपस्थिती होती या शिबिरात 100 विद्यार्थ्यांनी या शिबीराचा लाभ घेतला.

यावेळी गावचे सरपंच युवराज बागल,उपसरपंच सतीश बागल, मुख्याध्यापक वानोळे सर, व सर्व शिक्षकवृंद तसेच शालेय व्यवस्थापन कमिटी सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.