तुळजापूर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचे किसन भाऊ देडे यांनी मानले आभार.

प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव.

तुळजापूर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचे किसन भाऊ देडे यांनी जाहीर आभार मानले आहे, काक्रंबा येथील झोंबडे यांच्या मुलाचा अपघात झाला होता त्या मुलाला ऑपरेशन साठी रेशन कार्ड नसल्याने त्यांनी, किसन भाऊ देडे यांना फोन केला व वरील हकीकत सांगितली लगेच तहसील कार्यालय येतील सुरेश वाघमारे साहेब यांना किसन भाऊ देडे यांनी फोन केला व त्यांना वरील हकीकत सांगितली यांनी मला तात्काळ त्यांच्या कुटुंबातील सर्वांचे आधार कार्ड घेऊन बोलावले सर्व प्रोसेस करून सुरेश भाऊ यांनी 1 दिवसात राशन कार्ड काडून दिले त्याबद्दल पुरवठा विभागातील सर्व कर्मचाऱ्याचे जाहीर आभार मानले, त्यांच्या कडून अशीच सेवा घडावी हीच त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या,यावेळी मनिषा कोळगे मॅडम, पुरवठा निरीक्षण अधिकारी,निशिकांत भोज, अव्वल कारकून, यांच्यासह पुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.