दि महाराष्ट्र स्टेट को - ऑप बँक लिमिटेड नागपूरचे डिव्हिजनल मॅनेजर डॉ कोंडवलकर,यांच्या हस्ते जय भवानी विकास संस्था नूतन चेअरमन श्री अनिल दादा हंगरगेकर यांचा सत्कार

संपादक रुपेश डोलारे तुळजापूर धाराशिव

दिनांक ,२२ जानेवारी २०२५ रोजी, दी महाराष्ट्र स्टेट को - ऑप बँक लिमिटेड नागपूरचे डिव्हिजनल मॅनेजर डॉक्टर श्री कोंडवलकर साहेब, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गायकवाड साहेब, व मुख्यालयातील सर्व मुख्याधिकारी साहेब,तसेच तुळजापूर शाखेचे डी सी सी बँकेचे बाळासाहेब भागवत यांच्या उपस्थितीत जय भवानी विकास संस्था नूतन चेअरमन श्री अनिल दादा हंगरगेकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तालुक्यातील सर्व सोसायटीचे संचालक व चेअरमन मोठ्या संख्येने उपस्थित होते.