सावरगाव येथे नवी मुंबई जीवन विकास चॅरिटेबल ट्रस्ट नवीन पनवेल, यांचे विद्यमाने, महात्मा फुले मागासवर्गीय विद्यार्थी वसतीगृहामध्ये विद्यार्थ्यांचा गुणगौरव व बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न.

 




संपादक रुपेश डोलारे तुळजापूर धाराशिव.

नवी मुंबई जीवन विकास चॅरीटेबल ट्रस्ट, नवीन पनवेल, यांच्या विद्यमाने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून 25 जानेवारी 2025 रोजी जि. प. प्रशाला सावरगाव येथील विद्यार्थ्यांचा गुणगौरव ब बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समिती सावरगाव, अध्यक्ष पवार सर, सन्माननीय मुख्याध्यापक श्री वाघ एस जी सर, जि प प्रशाला हायस्कूल सावरगाव, मुख्याध्यापक शेडयुळे सर, 


जि प प्राथमीक मुलांची शाळा मुख्याध्यापक श्रीमती कुंभार मॅडम, जिल्हा परिषद कन्या शाळा तसेच शिक्षक वृंद 

तसेच संस्थेचे अध्यक्ष माननीय रघुनाथ चोखा डोलारे 

संस्थेचे खजिनदार माननीय भीमराव सोपान डोलारे यांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक वाघ सर यांनी केला तर संस्थेचे अध्यक्ष यांनी उपस्थित प्रमुख पाहुणे आणि मुख्याध्यापकांचा सत्कार करून, भारताचे संविधान उद्देशिका आणि तिरंगी दुपट्टा देऊन स्वागत केले. 


त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष यांनी उद्देश पर प्रस्ताविक केले, ते आपल्या भाषणात म्हणाले संस्था ही गेली वीस वर्षापासून नवीन पनवेल नवी मुंबईमध्ये कार्यरत आहे. संस्थेचे रजिस्ट्रेशन 15 मे 2004 रोजी झाले तेव्हापासून आज तागायत आहे. संस्था विविध ठिकाणी बऱ्याच शाळेमध्ये असे कार्यक्रम घेत आली आहे. विद्यार्थ्यांना नेट टेक्नॉलॉजीचे मार्गदर्शन, गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना कला क्रीडा स्पर्धेमध्ये पहिला दुसरा येणाऱ्या मुलांना बक्षीस वितरण कार्यक्रम दरवर्षी घेतले जातात त्याच प्रमाणे वृक्षारोपणाचा कार्यक्रम होतो, त्यानंतर महिलांच्या आरोग्या विषयी आणि महिला सक्षमीकरण यावर मार्गदर्शन केले जाते आणि त्याचाच भाग म्हणून आज आपल्या जिल्हा परिषद प्रशाला सावरगाव येथे कार्यक्रम घेतला आहे. संस्थेने नवीन पनवेल मध्ये अनेक विविध कार्यक्रम राबवले आहेत विशेषतः संस्थेचे ध्येय्य, गरीब उपेक्षित मुला मुलींना आणि महिलांना वर आणण्यासाठी जास्तीत जास्त त्यांना सुविधा उपलब्ध करून देऊन त्या मार्फत त्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करीत आहे. पुढील काळामध्ये महिलांना ज्या विधूर, घटस्पोटीत आहेत, गरीब आहेत, वंचित आहेत त्यांना शिवण क्लास, शिलाई मशीन तसेच काही महिलांना बांगड्याचा व्यवसाय, काही महिलांना भाजीपाला व्यवसाय तर काही महिलांना ब्युटी पार्लरचा व्यवसाय, ज्या ज्या महिलांना त्यांच्या आवडीप्रमाणे विषय निवडून 10 महिलांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी संस्थेमार्फत त्यांना साहित्यांचे वाटप करून त्यांना व्यवसायामध्ये सहकार्य करण्याचा प्रयत्न आहे. त्यांच्या मुलाबाळाचे शिक्षण आणि त्यांच्या रोजी रोटीचा प्रश्न मिटेल अशा पद्धतीने संस्था वाटचाल करत आहे.












26 जानेवारी 2025 रोजी नवी मुंबई जीवन विकास चॅरिटेबल ट्रस्ट नवीन पनवेल, यांचे विद्यमाने, महात्मा फुले मागासवर्गीय विद्यार्थी वसतीगृहामध्ये विद्यार्थ्यांचा गुणगौरव व बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला.

प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉक्टर दुष्यंत मनोहर कटारे सर तसेच संस्थेचे अध्यक्ष रघुनाथ डोलारे, संस्थेचे खजिनदार भीमराव डोलारे, महात्मा फुले मागासवर्गीय विद्यार्थी वस्तीगृहाचे अधिक्षकसाबळे सर संस्थेचे अध्यक्ष शिवाजी फडके तसेच संस्थेचे सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला,विविध स्पर्धा घेतलेल्या आहेत त्या स्पर्धेमधील पहिला दुसरा आणि तिसरा व इतर सर्व मुलांना प्रोत्साहन पर बक्षीस दिली जाणार आहेत, त्यानंतर सर्व उपस्थितांना अल्पोहाराचे वाटप केले.