Home “येरमाळा पोलीस ठाणे हद्दीत विहरीतील पाणी देण्या घेण्याच्या कारणावरुन खुन.”
“येरमाळा पोलीस ठाणे हद्दीत विहरीतील पाणी देण्या घेण्याच्या कारणावरुन खुन.”
प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव येरमाळा पोलीस ठाणे हद्दीतील मौजे बावी शिवारातील शेत गट 220 येथे आरोपी नामे-भाग्यवंत दशरथ काळे, वंदना भाग्यवंत काळे, उत्तरेश्वर भाग्यवंत काळे, कलावती दशरथ काळे, सनिल परमेश्वर काळे, रेखा परमेश्वर काळे, बालू बाई उत्तरेश्वर काळे, राजेंद्र भाउ काळे, तात्या बापू काळे, नागेश उत्तरेश्वर काळे, सर्व रा.बोरी ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि. 05.01.2025 रोजी 19.00 वा. सुमारास मयत नामे- आप्पा भाउ काळे, वय 65 वर्षे, परमेश्वर आप्पा काळे, वय 22 वर्षे, यांना नमुद आरोपींनी सामायीक विहिरीतील पाणी देण्या घेण्याचे कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून मयत- आप्पा व परमेश्वर यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, कत्ती, काठ्या, चाकू व बेल्टेने मारहाण करुन जिवे ठार मारले. फिर्यादी नामे- राहुल आप्पा काळे, वय 26 वर्षे, रा. गोजवाडा ह.मु. बावी ता. वाशी जि. धाराशिव हे व त्यांची आई वैजंता आप्पा काळे हे भांडण सोडवण्यास गेले असता नमुद आरोपींनी त्यांनाही जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण करुन गंभीर जखमी केले. यावरुन येरमाळा पोलीस ठाणे येथे फिर्यादी नामे- राहुल काळे यांनी दिलेल्या प्रथमखबरेवरुन गुरनं 04/2025 कलम 103(1), 118(1), 115(2), 189(2), 191(2), 191(3), 190 अन्वये गुन्हा नोदंवला आहे.
तसेच आरोपी नामे-राहुल आप्पा काळे, परमेश्वर आप्पा काळे, रुक्षलाबाई राहुल काळे, वैजंताबाई आप्पा काळे, आप्पा भाउ काळे, सर्व रा. गोजवाडा हल्ली मुक्काम बावी ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि. यांनी दि. 05.01.2025 रोजी 19.00 वा. सुमारास मौजे बावी शिवारातील शेत गट 220 येथे मयत नामे- सुनिल परमेश्वर काळे, यांना नमुद आरोपींनी सामायीक विहिरीतील पाणी देण्या घेण्याच्या कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून मयत- सुनिल काळे यास शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, चाकू विळा व लाकडी दांड्याने मारहाण करुन जिवे ठार मारले. फिर्यादी नामे- वदंना भाग्यवंत काळे, वय 35 वर्षे, रा. बोरी ता. वाशी जि. धाराशिव यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पोलीस ठाणे येरमाळा येथे गुरनं 05/2025 कलम 103(1), 118(1), 115(2), 189(2), 191(2), 191(3), 190,352,109 अन्वये गुन्हा नोदंवला आहे.