*आयआयटी मुंबईच्या 'Techfest 2024' मध्ये नांदेडमधील विद्यार्थ्यांचा सहभाग* *"Meza solver" प्रकल्पाची 'Techfest' मध्ये प्रशंसा

प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव

विज्ञान व तंत्रज्ञानातील विविध आविष्कारांची जादुई दुनिया आयआयटी मुंबईच्या 'टेकफेस्ट'च्या माध्यमातून दरवर्षी अनुभवता येते. 16 ते 19 डिसेंबरदरम्यान आयआयटी मुंबईमध्ये टेकफेस्टचं आयोजन करण्यात आले होते... यात नांदेडच्या मातोश्री प्रतिष्ठानकडून विद्यार्थांनी सहभाग घेतला होता... महाविद्यालयाकडून सहभागी विद्यार्थी संकेत राठोड, देवराव बोकारे, अजिंक्य कदम, आकाश मस्के , प्रफुल जाधव आणि अमोल जाधव यांचा सत्कार करण्यात आला... 

MPGI कॉलेजच्या संगणक अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांनी IIT बॉम्बे झोनल टेकफेस्ट 2024 मध्ये त्यांच्या "मेझ सोल्वर" (Maze Solver) या प्रकल्पाद्वारे यशस्वी कामगिरी केली आहे. या प्रकल्पाने टेकफेस्टमध्ये उल्लेखनीय प्रशंसा मिळवली असून, विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचा आणि तंत्रज्ञानातील कौशल्याचा उत्तम नमुना सादर केला आहे.

तांत्रिक ज्ञानाचा वापर करून अडथळ्यांचा मार्ग शोधणे, वेगवान निर्णय घेणे आणि प्रगत संगणकीय तंत्रज्ञानाची जोड देणे, हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे. या प्रकल्पामुळे MPGI कॉलेजने आपल्या विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्याची ओळख सिद्ध केली आहे. महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या या यशाचा सन्मान करण्यासाठी विशेष साजरा आयोजित केला.

*शुभेच्छुक* - 

संस्थेच्या अध्यक्षा - सौ. जयश्री कामाजी पवार ( सचिव ) आणि श्री. व्यांकटआचार्य,

व्यवस्थापकीय संचालक - श्री. अरविंद पाटील,

डॉ. ल. म. वाघमारे सर ( प्रीन्सिपल MPGI),

श्री. प्रवीण किनिकर सर ( प्रशासकीय अधिकारी MPGI ),

श्री. पी. डी. पोपळे सर ( ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर तथा विभाग प्रमुख स्थापत्य अभियांत्रिकी शाखा ),

श्री. बी. ए. खांसोळे सर ( विभाग प्रमुख संगणक अभियांत्रिकी शाखा ),

श्री. असाद हाश्मी सर ( विभाग प्रमुख विद्युत अभियांत्रिकी शाखा),

डॉ. अब्दुला म. के. ( विभाग प्रमुख अणुविद्यूत अभियांत्रिकी शाखा ),

डॉ. सयेदा रुखसाना मॅडम ( विभाग प्रमुख प्रथम वर्ष शाखा ),

श्री. सय्यद शफीक सर ( विभाग प्रमुख यंत्र अभियांत्रिकी शाखा ) आणि स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे सहायक प्रोफेसर 

श्री. दिपक राठोड सर ( *विद्यार्थ्यांचे शुभचिंतक* )