शेतकऱ्यांनी उद्यमी व्हावे - कुलगुरू डॉ इंद्र मणी ॲग्रोकेअरचे महाॲग्रो आयडॉल पुरस्कार वितरण.

प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव

शेतीसोबत शेतकऱ्यांनी कृषी व्यवसायातून आर्थिक उन्नती साधावी, तसेच उद्योजकता निर्मितीतून रोजगार निर्मिती शक्य आहे. आपले वैयक्तिक जीवन जगताना आपण इतरांना देखील प्रोत्साहित करणे गरजेचे आहे, आपल्या सोबत अनेक लोकांना मोठे करणे गरजेचे आहे आणि हेच काम कृषिभूषण फेडरेशन तर्फे शेतकऱ्यांसाठी होत आहे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी केले.

ॲग्रोकेअर कृषीमंच संस्थेचा १६ वा राष्ट्रीय महा ॲग्रो आयडॉल पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी धाराशिव येथे ते अध्यक्षस्थानी बोलत होते. 

 महाराष्ट्रातील कृषी संशोधक, कृषी विस्तारक, कृषी उद्योजक, शेतकरी, कृषी विभागातील अधिकारी यांना ॲग्रोकेअर संस्थेद्वारे दरवर्षी सन्मानित करण्यात येते. यावर्षी देखील या पुरस्काराचे वितरण डीपीडीसी हॉल, धाराशिव येथे दिनांक ७ जानेवारी २०२५ रोजी करण्यात आले होते. या पुरस्काराच्या वितरण प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषि विद्यापीठ परभणीचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गिरधारी वाघमारे, महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्माचे प्रकल्प संचालक खंडेराव सराफ, कृषी विज्ञान केंद्र तुळजापूरचे प्रमुख डॉ. सचिन सूर्यवंशी, ॲग्रोकेअर ग्रुप ऑफ कंपनीजचे चेअरमन भूषण निकम, रोहिणी पाटील हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

हे वर्ष पुरस्काराचे १६ वे वर्ष होते. भूषण निकम यांच्या संकल्पनेतून दरवर्षी हा पुरस्कार वितरण मोठ्या उत्साहाने संपन्न होत असतो. *या कार्यक्रमाच्या निमित्ताने शेतकरी, कृषी उद्योजक व शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी एक दिवशीय कृषी उद्योजकता निर्मिती कार्यशाळेचे आयोजन देखील करण्यात आले होते. प्रमुख उपस्थित मान्यवर मधून डॉ. गिरधारी वाघमारे, डॉ. सचिन सूर्यवंशी, रवींद्र माने या प्रमुख मान्यवरांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी कृषीभूषण फेडरेशनचे चेअरमन भूषण निकम व दीपक पाटील यांनी मार्गदर्शन केले. 

कार्यक्रमाच्या प्रास्ताविक मधून ऍग्रोकेअर संस्थेचे कार्य याविषयी संस्थेचे अध्यक्ष भूषण निकम व रोहिणी पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा साखरे यांनी केले तर आभार दीपक पाटील यांनी व्यक्त केलेत.

*या वर्षाचे पुरस्कार मान्यवर खालील प्रमाणे*

विद्या प्रतिष्ठानचे कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, बारामती, डॉ. सौ. सरोज कुलकर्णी (नंदुरबार) गणेश नवगण (अकलूज), सुशीलशेठ चव्हाण (करमाला), सुरेश पवार (सांगोला), बालाजी बोबडे, हनुमान गरुड (बिड), डॉ. भैयासाहेब गायकवाड, भगवान अरबड, अपेक्षा कसबे , दर्शना भुजबळ, नानासाहेब टिंगरे (तुळजापुर ), उमेश भिलारे, पांडुरंग बरळ (इंदापूर), डॉ. पंकज कावळे, चेतन जाधव (धाराशिव), डॉ. विजय भामरे (लातूर), कृषक शेतकरी गट (कोल्हार), श्री. डॉ. खुशी जोशी(सातारा), डॉ. संतोषकुमार केदार (लखनौ), डॉ. शर्मिला शिंदे (राहुरी), डॉ. विजेंद्र बाविस्कर (पुणे), नितीन मुळे, विलास टेकळे (मोहोळ), सुदर्शन घोडके (गेवराई ), संभाजी कोडग (सांगली), तात्यासाहेब कळसाईत, जगन्नाथ मगर, खुशालचंद मोरे, वैभव देशमुख (सोलापुर)