नवनिर्मिती प्रेरणा बहुउद्देशीय महिला मंडळ सामाजिक संस्था तुळजापूर यांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन

प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव

तुळजापूर येथील तहसील कार्यालय तहसीलदार साहेब यांना घरेलू कामगार संदर्भात महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ धाराशिव यांच्या कार्यालयातून देण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी 22/1/24 रोजी धाराशिव येथील कार्यालयामध्ये लाभार्थ्यांनी अर्ज दाखल केला होते एक वर्ष उलटून अद्यापही अर्जदारांना कसल्याही प्रकारचा लाभ मिळालेला नाही एवढेच नाही तर नोंदणी झालेल्या धाराशिव येथील महाराष्ट्र कामगार मंडळ कार्यालयातून फोन करून त्यांना भांडे मिळणार असल्याचे सांगत कार्यालयामध्ये बोलावून भांडे ठेवलेल्या जागेजवळ उभा करून त्यांचे फोटो काढून घेतले,आणि त्यांच्या सह्या घेतल्या पाच सहा महिने उलटून गेले तरीही कोणत्याच लाभार्थ्याला साहित्य अथवा योजनेचा कोणताच लाभ मिळालेले नाही तरी या संदर्भात तुळजापूर येथील महिला अर्जदार लाभार्थ्यांनी याबाबत तुळजापूर येथील तहसीलदार यांच्याकडे धाव घेतली व झालेली हकीकत निवेदनाद्वारे त्यांना सांगितले,


 याबाबत लवकरात लवकर त्या कार्यालयातील अधिकारेची चौकशी करण्यात यावी व यामध्ये लाभार्थ्यांना मिळालेल्या वस्तू कोणापर्यंत गेल्या याची चौकशी करण्यात यावी अन्यथा न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल याची दखल सदरील महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी अशी महिलांच्या मार्फत निवेदन करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ता मीनाताई सोमाजी संध्या खुरुद रूपाली घाडगे लता सोमाजी लता हरवलकर सुनिता काळे सविता कानडे जयश्री भालेकर श्रीमती माधुरी पाटील कविता पवार सविता लबडे सुनिता मसारे शांता सुरवसे अनिता शिंदे कमल दांडे स्मिता जमदाडे इत्यादी महिलांनी निवेदन दिले.