प्रजासत्ताक दिनाच्या निमंत्रण पत्रिकेत दुजाभाव.



संपादक रुपेश डोलारे, तुळजापूर धाराशिव

तुळजापूर - ७६ व प्रजासत्ता दिन उद्या असून तुळजापूर तहसील कार्यालया मार्फत दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या निमंत्रण पत्रिका तालुक्यात राजकीय पुढारी, समज सेवक नागरिक, माजी स्वतंत्र सैनिक, शहरातील प्रतिष्ठित नागरिक व पत्रकार यांना ध्वजारोहणाची निमंत्रण पत्रिका दिली जाते.पण यावर्षी निमंत्रण पत्रिका मध्ये दुजाभाव केला असून काही पत्रकारांना धाराशिव येथे होत असलेल्या ध्वजारोहणाच्या पत्रिका देण्यात आल्या ते पण पत्रिकेवर नाव सुद्धा न टाकता पत्रिका दिल्या व काही जणांना तुळजापूर तहसील कार्यालयाच्या नावासहित पत्रिका दिल्या आहेत.या मागे तहसील कार्यालयातील कर्मचारी याचा खोडसळपणा असून त्यावर योग्य ते कारवाई व्हावी.