“दिवसा घरफोडी करणार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून ताब्यात


प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव

दि.07.02.2025रोजी पोलीस ठाणे येरमाळा चे हद्दीततील मौजे वडगाव येथील रामभाउ गहिनीनाथ नवले हे त्यांचे शेतात दैनंदिन कामकाजाकरीता गेले असता अज्ञात इसमाने त्यांचे घराचे दरवाजचा लोखंडी कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करुन घरातील कपाटामधील सोन्याचे दागिने व रोख रक्कम एकुण 15,79,600₹ चा मुद्देमाल चोरुन नेला होता. सदरबाबत पोस्टे येरमाळा येथे अज्ञात आरोपीविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव साहेब यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेस सदर बाबत सखोल तपास करण्याचे आदेशित केले. दि.12.02.2025 रोजी स्थानिकगुन्हे शाखेचे सपोनि कासार व पथक यांनी तांत्रिक विश्लेषणातुन आरोपीचा शोध घेतला असता एका इसमाचे नाव समोर आले. सदरबाबत त्यांनी तात्काळ अधिक खात्री केली असता नमुदचा गुन्हा आरोपी नामे- सुरज दादासाहेब शिनगारे रा. शेलगाव, ता. कळंब जि. धाराशिव यांने केल्याचे निष्पन्न झाल्याने तात्काळ नमुद इसमाचा शोध घेवून त्यास अत्यंत शिताफीने ताब्यात घेवून त्याचेकडे गुन्ह्याचे अनुषांगाने चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली असता त्याचे कडे अधिक चौकशी केली त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली देवून चोरीचे मुद्देमालाबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला सर्व माहिती दिली. सदर पथकाने तात्काळ चोरी केलेले 18 तोळे सोन्याचे दागिने, रोख रक्कम 40,000 ₹ व गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल असा एकुण 15,09,600₹ किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. नमुद आरोपी व मुद्देमाल पुढील कारवाईकामी पोस्टे येरमाळा येथे हजर केले आहे.

सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन यांचे मार्गदर्शनाखाली स्थागुशा, धाराशिव चे सपोनि- श्री. सुदर्शन कासार, सपोफौ वलीउल्ला काझी, पोलीस हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, फहरान पठाण, मपोह शैला टेळे, पोअं योगेश कोळी, चालक रत्नदिप डोंगरे, नितीन भोसले यांच्या पथकाने केली आहे.