कुंभारी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव येथे IBL बँक यांच्या अर्थसहाय्यातून व वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट चालू असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण समुदाय समग्र विकास कार्यक्रम अंतर्गत विभागीय महिला मेळावा.
दिनांक 3 फेब्रुवारी 2025 रोजी मौजे कुंभारी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव येथे IBL बँक यांच्या अर्थसहाय्यातून व वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट चालू असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण समुदाय समग्र विकास कार्यक्रम अंतर्गत विभागीय महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. तुळजापूर तालुक्यातील कुंभारी, कोरेवाडी,कदमवाडी, सारोळा, धनेगाव,गोंधळवाडी, पिंपळा खुर्द, पिंपळा बु, यमगरवाडी, चिंचोली, कसई, येवती, काळेगाव, दिंडेगाव, चिवरी, उमरगा, शिरगापूर, अरबाळी , हिप्पारगा ताड, फुलवाडी अशा 20 गावातील 730 महिला या विभागीय महिला मेळाव्यासाठी उपस्थित होत्या, या मेळाव्यामध्ये शेती व पाणी, आरोग्य व पोषण, शिक्षण, पायाभूत सुविधा व कौशल्य विकास आदी विषयावर महिलांनी व शेतकऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच या कार्यक्रमासाठी उपस्तित मान्यवराणी शासनाकडून मिळणाऱ्या योजना, महिलांचे अधिकार, महिलांचे शेती क्षेत्रातील योगदान, बालविवाह, गृहउद्योग, महिलांचे आरोग्य शाश्वत शेती, पाणलोटची गरज अशा विविध विषयावर मारदर्शन केले. व मेळाव्यास उपस्थित सर्व महिलांना महिला ग्रामसंघ कुंभारी यानि लोकसहभागातून 1000 शेवग्याच्या रोपाचे वाटप केले.यावेळी श्री पी. आय. खांडेकर सर (पोलीस निरीक्षक तुळजापूर ), मा. श्री महेश देवकते (तालुका कृषी अधिकारी तुळजापूर,) श्रीमती प्रज्ञा बनसोडे (सामाजिक कार्यकर्त्यां बालसंरक्षण कक्ष धाराशिव ), सौ.इंदू राठोड ( एकात्मिक बालविकास विभाग तुळजापूर सुपरवायझर ), सौ माया जाधव (एकात्मिक बालविकास विभाग तुळजापूर सुपरवायझर),अमित भोसले (मंडळ कृषी अधिकारी तुळजापूर )
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.