सरपंच व उपसरपंच यांचेवर अविश्वास ठरावावर सही करण्याचे कारणावरुन जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉडने मारहाण, तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.




संपादक रुपेश डोलारे तुळजापूर धाराशिव

तुळजापूर पोलीस ठाणे :आरोपी नामे- योगेश बाळासाहेब पाटील, विनोद बाळासाहेब पाटील, प्रविण विठ्ठल नागदे, सुशिल राम धनके, सर्व रा. सारोळा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.24.02.2025 रोजी 12.30 वा. सु. सारोळा येथे फिर्यादी नामे-शिवाजी शहाजी कांबळे, वय 30 वर्षे, रा. सारोळा (मा) ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी सरपंच व उपसरपंच यांचेवर अविश्वास ठरावावर सही करण्याचे कारणावरुन जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉडने मारहाण करुन जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-शिवाजी कांबळे यांनी दि.25.02.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 118(1), 115(2), 352, 351(2),351(3), 3(5) सह अ.जा.ज.अ.प्र. कायदा कलम 3(1)(आर)(एस) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास तुळजापूर पोलीस करत आहेत.