वेताळ नगर तुळजापूर येथे,थोर समाजसुधारक वीरशरण श्री संत कक्कय्या महाराज यांची जयंती साजरी



संपादक रुपेश डोलारे तुळजापूर धाराशिव

 १२ व्या शतकातील महात्मा बसवेश्वर महाराज यांचे पट-शिष्य,लिंगायत धर्म व लिंगायत धर्म वचन साहित्याचे रक्षक,थोर समाजसुधारक वीरशरण श्री संत कक्कय्या महाराज यांच्या ९२० व्या जयंती निम्मित प्रति वर्षा प्रमाणे या वर्षीही वेताळ नगर तुळजापूर येथे जयंती उत्सव साजरा करण्यात आला व शाबु प्रसादाचे वाटप करण्यात आले,

 कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती समाज सेवक नरेश (काका) अमृतराव यांच्या हस्ते आरती करण्यात आली व उपस्थित तुळजापूर ढोर समाजाचे नेते सागर (भैय्या) चौगुले, दादा पारदे , , संतोष चौगुले ,पांडुरंग नारायणकर , राजेंद्र चौघुले , संतोष शिंदे , शाहिद शेख , करण कोनाळे , आप्पा गायकवाड ,जमीर शेख ,राहुल उबाळे ,असे अनेक समाज बांधव उपस्थित होते शेवटी सागर चौगुले यांनी उपस्थितांचे आभार मानले.