श्री कालिका देवी वार्षिक महोत्सव, रविवार २३ फेब्रुवारी रोजी होणार. जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा -सोमवंशीय क्षत्रिय कासार समाज, श्री क्षेत्र तुळजापूर यांचे आवाहन.

 


संपादक रुपेश डोलारे तुळजापूर धाराशिव

श्री कालिका देवी वार्षिक महोत्सव, रविवार २३ फेब्रुवारी रोजी होणार. जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा -सोमवंशीय क्षत्रिय कासार समाज, श्री क्षेत्र तुळजापूर यांचे आवाहन.

प्रति वर्षाप्रमाणे श्री कालिका देवी वार्षिक महोत्सव सण-२०२५ मिती माघ कृ. १० शके १९४६ रविवार दिनांक २३ फेब्रुवारी २०२५ रोजी श्री कालिका देवी ठाण, श्री क्षेत्र तुळजापूर येथे उत्साहात संपन्न होत आहे. या प्रसंगी श्री कालिका मातेची थोरवी, भक्ती, शक्ती आपणांस प्रेरणा देणारी ठरेल, आपणही हा दिव्य भक्तिपूर्ण सोहळा सहकुटुंब अनुभवावा म्हणून हे आग्रहाचे निमंत्रण !


धार्मिक कार्यक्रम

अभिषेक, महापूजा, नवचंडी यज्ञ, श्री दुर्गासप्तशती पठण आणि महाआरती


महापूजा यजमान

सौ. सुवर्णा बाळकृष्ण कोकीळ श्री. बाळकृष्ण मोतीलाल कोकीळ

अन्नदान यजमान

सौ. वर्षा नंदकुमार निडारकर श्री. नंदकुमार नरसीमलु निडारकर (कै. रशिकांत कालिदास मैंदर्गे यांच्या स्मरणार्थ)


महाप्रसाद


रविवार दिनांक २३ फेब्रुवारी २०२५ रोजी, दुपारी १२.३० ते सायं ०४ पर्यंत उत्सव स्थळी


सजावट सौजन्य


श्री. राजू शेठ झरकर (धाराशिव)


सन्माननिय बंधू /भगिनीनों,


कुलदैवत व आदिशक्ती श्री तुळजाभवानीच्या पुण्य क्षेत्री नवदुर्गा, अष्टभैरव, परिवार देवतांची विशिष्ट स्थाने असून प्राचीन काळी श्री कालिका देवीचे वास्तव्य श्री तुळजाभवानीच्या प्रांगणात होते असे ऐकिवात आहे परंतु कालौघात ते नामशेष झाले. तरीपण पूर्वापार कालावधी पासून यमुनाचल पर्वत रांगेत निसर्गरम्य अशा ठिकाणी श्री कालिका देवी ठाण मांडून आहे. समस्त कासार समाज, भाविक भक्त आमवस्या व इतर प्रासंगिक समयी सिंदफळ शिवारातील या देवीची आराधना करत असल्याचा उल्लेख कालीकापुराण या ग्रंथात आढळतो. अशा या उर्जित क्षेत्री होत असलेल्या महोत्सवात आपण सहकुटुंब उपस्थित राहून अध्यात्मिक, धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा व अलौकिक आनंद आणि पुण्य लाभ अर्जित करावे ही नम्र विनंती.


आयोजक -


सोमवंशीय क्षत्रिय कासार समाज, श्री क्षेत्र तुळजापूर


कार्यक्रम स्थळ -


श्री कालिका देवी ठाण, सिंदफळ शिवार, अपसिंगा रोड, टाटा संस्थान शेजारी, श्री क्षेत्र तुळजापूर


वाहन व्यवस्था -


आर्य चौक आणि कणे बस स्टॉप, श्री क्षेत्र तुळजापूर. तरी जास्तीत जास्त भाविक भक्तांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा.असे आवाहन सोमवंशीय क्षत्रिय कासार समाज,श्री क्षेत्र तुळजापूर यांनी केले आहे.