सायबर पोलीस ठाणे:तक्रारदार नामे- श्री. सैफअली सुलेमान सय्यद, वय 35 वर्षे, रा.ख्वाजा नगर ता. जि. धाराशिव यांना दि.08.03.2025 रोजी एका इसमाने त्यांच्या मोबाईलवर फोन करुन त्यांच्या क्रेडीट कार्डवर ॲमेझॉन व फ्लिपकार्टवर खरेदी करण्यासाठी ऑफर आहे असे सांगून ऑफर लागू करण्यासाठी त्यांच्याकडूनओटीपी घेतला. त्यानंतर तक्रारदार यांच्या क्रेडीट कार्डमधून 1,90,052₹ विथड्रॉल झाल्याचा मोबाईलवर मेसेज आला. त्यावेळी तक्रारदार ताबउतोब सायबर पोलीस ठाणे येथे आले असता त्यांची एनसीसीआर पोर्टलवर क्र.31903250041084 अन्वये तक्रार दाखल केली होती.
धाराशिव सायबर पोलीसांनी तांत्रिक विश्लेषण केले असता सदरची रक्कम ॲमेझॉन पेवर वर्ग झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. अॅमेझॉन पे नोडल अधिकारी यांचेशी संपर्क केल्यानंतर त्यांनी सदर रक्कमेतुन इसम नामे दीपेंद्रसिंग कुमार याने मुथुट पापाचान स्वर्णवर्शम या कंपनीकडून ऑनलाईन दोन तोळे सोन्याचे कॉईन खरेदी केले असुन ब्ल्यु डार्ट या कंपनीद्वारे सदरचे सोने वाराणसी राज्य उत्तरप्रदेश येथे डिलीव्हरी होणार असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यांनतर तात्काळ मुथुट पापाचान स्वर्णवर्शम व ब्ल्यु डार्ट या कंपनीच्या नोडल अधिकारी यांचेशी संपर्क करुन सायबर गुन्हेगाराने ऑनलाईन फसवणुकीतील रक्कमेतुन खरेदी केलेले दोन तोळे सोन्याचे कॉईनची ऑर्डर रद्द करुन यातील फिर्यादीचे 1,90,052₹ रिफंड करण्यात धाराशिव सायबर पोलीसांना यश आले आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री.संजय जाधव, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश कासुळे, सफौ कुलकर्णी, पोलीस हावलदार- हालसे, नाईकवाडी, महिला पोलीस नाईक- पौळ, पोलीस अमंलदार-जाधवर, भोसले, मोरे, तिळगुळे, कदम, काझी, सुर्यवंशी, महिला पोलीस अमंलदार- खांडेकर, शेख यांच्या पथकाने केली आहे.
सायबर पोलीस ठाणेच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही अनोळखी मोबाईल क्रमांकावरुन मेसेज/ लिंक/फोन/क्यू आर कोड आल्यास खात्री केल्याशिवाय आपल्या बॅक खात्याशी संबंधित कोणतीही माहिती व ओटीपी फोनद्वारे देव नये. किंवा लिंकवर क्लिक/क्यु आर कोड स्कॅन करुन नये. तसेच सायबर गुन्हा घडल्यास नागरिकांनी तात्काळ हेल्प लाईन क्र.1930 वर कॉल करुन सायबर गुन्ह्याची माहिती द्यावी किंवा www.cybercrime.gov.in या ऑनलाईन पोर्टलवर तक्रार नोंदवावी किंवा सायबर पोलीस ठाणे, धाराशिव येथे तात्काळ संपर्क करावा.
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.