न.प. प्रा.शा. क्र 2 च्या विद्यार्थ्यांना, आनंद कंदले मित्र परिवार ने दाखवला छावा चित्रपट


संपादक रुपेश डोलारे तुळजापूर महाराष्ट्र

तुळजापूर ( दि.११)

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा धगधगता, प्रेरणादायी दैदिप्यमान इतिहास दाखवणारा छावा चित्रपट तुळजापूर शहरातील नगर परिषद प्राथमिक शाळा क्र 2 च्या विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनाचे औचित्य साधून रुग्ण कल्याण समितीचे सदस्य तथा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आनंद (दादा) कंदले मित्र परिवार च्या वतीने दाखवण्यात आला.

 सुरवातीला छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून मुलांना चित्रपट गृहात बसवण्यात आले, या वेळी नगरसेवक विजय कंदले, नरेश अमृतराव, मुख्याध्यापक गणेश रोचकरी , महेंद्र कावरे , राम चोपदार, सागर कदम, जीवनराजे इंगळे, अण्णा देवकर, महेंद्र पाटील, बाळासाहेब जेटीथोर,सुज्ञानी गिराम, किरण लोहारे,विद्यादेवी स्वामी, शिवाजी डाके सर्व शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी वृंद उपस्थित होते.

  शाळेतील १०१ विद्यार्थ्यांना पिण्याचे पाण्याची व खाऊची व्यवस्था चित्रपट दरम्यान आनंद दादा कंदले यांच्या वतीने करण्यात आली होती.

  


 चित्रपटाच्या शेवटच्या क्षणी अनेक विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले,

 शंभू युवराज शिंदे कु. शितल रविकिरण साळुंखे या विद्यार्थ्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर भाषण केले.

आनंद कंदले यांनी यापूर्वी शेर शिवराय हा चित्रपट विद्यार्थ्यांना दाखवला होता.

  आर्थिक दृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांना चित्रपट पाहता यावा त्यांना इतिहासाची माहिती मिळावी हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांना मोफत चित्रपट दाखवण्याचाउपक्रम निश्चित प्रेरणादायी आहे.